Custerd Apple Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Custerd Apple Market : उन्हाळी सीताफळाला मिळतोय पाच हजार रुपये प्रति क्विंटल दर

Sitaphal Market : कळमना बाजारात सासवडमधून अवघी दहा क्‍विंटल आवक

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Sitaphal Rate : नागपूर ः राज्यातील पाच ते दहा टक्‍के शेतकऱ्यांच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या उन्हाळी सीताफळाची आवक नागपूरच्या कळमना बाजार समितीत होत असून, ही आवक अवघी १० क्‍विंटल असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. आठवड्यातील काही दिवसच पुण्याच्या सासवड भागातून सीताफळाची ही आवक होत असल्याचे व्यापारी सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्यात नजीकच्या काळात सीताफळाखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळेच १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत आवक होणाऱ्या सीताफळाला अपेक्षित दर मिळत नाही, असे चित्र सर्वदूर राहते. २० रुपये किलोपासून दर्जानिहाय फळांचे दर राहतात. याउलट शास्त्रोक्‍त व्यवस्थापन त्यासोबतच नैसर्गिकस्थिती अशा परिस्थितीच्या बळावर उन्हाळी सीताफळ घेता येते. पुणे जिल्ह्याच्या काही भागांत त्यातही मुख्यत्वे सासवड परिसरात अशी उन्हाळी सीताफळाला पोषकस्थिती राहते. त्यामुळेच या भागात उन्हाळी बहरात सीताफळ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असल्याचे सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्‍याम गट्टाणी यांनी सांगितले. यामध्ये नियोजनबद्धता असणे गरजेचे राहते त्यामुळे सीताफळाचे उत्पादन घेणाऱ्या एकूण बागायतदारांपैकी अशा शेतकऱ्यांची संख्या अवघी चार ते पाच टक्‍के इतकीच असते, असेही ते म्हणाले.

हा बहर घेण्यासाठी शेतकरी फेब्रुवारी महिन्यात बागेला पाणी देतात. जूनपासून याची फळे मिळण्यास सुरुवात होते आणि जुलैअखेरपर्यंत ती मिळत राहतात. नजीकच्या काळात नगर भागात प्रायोगिक तत्त्वावर काही शेतकरी हा बहर घेण्यास पुढे आले आहेत. १२० ते १५० रुपये किलो असा दर या काळातील सीताफळांना मिळतो. कळमना बाजार समितीत आवक होणाऱ्या सीताफळाचे दर ३००० ते ५००० रुपये क्‍विंटलचे होते. दर्जानिहाय दर निश्‍चित होतो, असे गट्टाणी यांनी सांगितले.


उन्हाळी हंगामात सीताफळ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अत्यल्प आहे. या बहरातील फळे घेण्यासाठी वातावरण पोषक हवे त्यासोबतच नियोजनबद्ध व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे ठरते. त्यामुळे सीताफळाचा उन्हाळी बहर घेणे आव्हानात्मक असल्याने शेतकरी याकडे वळत नाहीत. ९५ टक्‍के सप्टेंबरचा बहार घेतात. त्यामुळे आवक वाढल्याने दर पडतात. त्यावर उपाय म्हणून प्रक्रियेला प्रोत्साहन दिले जात आहे. सद्या महाराष्ट्रात सीताफळावर आधारीत ८० प्रक्रिया उद्योग उभे राहिले आहेत.
- श्‍याम गट्टाणी,
अध्यक्ष सीताफळ महासंघ, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

Dairy App: जनावरांचं संपूर्ण नियोजन कसं करावं?

Varkhede Barrage : शेळगाव, वरखेडे प्रकल्पांत जलसंचय यंदाही १०० टक्के अशक्य

SCROLL FOR NEXT