Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : उन्हाळी पीक, फळबागांना अवकाळी पावसाचा फटका

Crop Damage : पावसामुळे उन्हाळी पीक, फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Team Agrowon

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने शनिवारी (ता.३०) हजेरी लावली. वादळीवाऱ्‍यामुळे मारेगाव, राळेगाव, केळापूर तीन तालुक्यांतील ३२ घरांची पडझड झाली. पावसामुळे उन्हाळी पीक, फळबागांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

जिल्ह्याचा पारा ४२ अंशावर गेलेला आहे. त्यामुळे उकाडा वाढलेला आहे. दुसरीकडे दोन दिवसांपासून जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून, शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे.

दरम्यान, गेल्या शुक्रवारी (ता.२९) दिग्रस तालुक्यातील काही गावांना फटका बसला. शनिवारी (ता.३०) सकाळपासूनच ढगाळी वातावरण होते. सायंकाळी उमरखेड, महागाव या तालुक्यांत वादळीवारा, विजांच्या कडकडाटात पावसाने हजेरी लावली. रात्री मारेगाव, राळेगाव आणि केळापूर तालुक्यांतही तशीच परिस्थिती निर्माण झालेली होती.

वादळीवाऱ्‍यामुळे मारेगाव तालुक्यातील २०, राळेगाव एक आणि केळापूर तालुक्यातील ११ असे ३२ घरांचे नुकसान झाले. अनेकांच्या घरांवरील टिनाचे पत्रे उडून गेले. त्याचप्रमाणे घाटंजी, राळेगाव येथील प्रत्येकी एक असे मिळून दोन जनावरांचा मृत्यू झाला. यासोबतचा मारेगाव तालुक्यात १० हेक्टरवरील गहू व ज्वारी पिकांचे नुकसान झाले.

ग्रामीण भागातील वीजपुरवठा खंडित

वादळीवाऱ्‍यामुळे मारेगाव तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक ठिकाणांचे वीज खांब, रोहित्रे कोसळले. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील वीजपुरवठा खंडित झालेला होता. परिणामी नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT