Sugarcane Labor Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Labor : कोल्हापुरात ३० ऊसतोड कामगारांना सानुग्रह अनुदानासाठी मान्यता

Sugarcane Labor Welfare : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्राप्त ३० ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांना बैठकीत मान्यता देण्यात आली.

Team Agrowon

Kolhapur News : लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळ सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्राप्त ३० ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांना बैठकीत मान्यता देण्यात आली. हे प्रस्ताव सानुग्रह अनुदनासाठी ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाकडे पाठवण्यात येणार आहेत.

याबाबत जिल्हास्तरावरील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षि शाहू सभागृहात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी सदस्य सचिव ऊसतोड कामगार जिल्हास्तरीय समिती तथा सहायक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे यांनी ऊसतोड कामगारांच्या प्रस्तावांची माहिती सादर केली.

या वेळी वैयक्तिक अपघात, मृत्यू, अपंगत्व वैद्यकीय खर्च, बैलजोडी मृत्यू तथा अपंगत्व याबाबत आलेल्या विविध प्रस्तावांबाबत माहिती देण्यात आली. जिल्ह्यात एकूण ३१ प्रस्ताव आतापर्यंत प्राप्त असून यातील ३० प्रस्तावांना बैठकीत मंजुरी देण्यात आली तर एक प्रस्ताव नैसर्गिक मृत्यूचा असल्याचे सदस्य सचिव श्री. साळे यांनी सांगितले.

या वेळी प्रा. डॉ. सुभाष जाधव, राज्य सरचिटणीस व प्रा. आबासाहेब चौगुले राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटना, डॉ. सुप्रिया देशमुख जिल्हा शल्यचिकित्सक, सदानंद बगाडे समाजकल्याण निरीक्षक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे यांनी, अजूनही जिल्ह्यात काही प्रस्ताव असल्यास याबाबत माहिती कारखानदारांकडून मागवून घ्या, अशा सूचना केल्या. ते म्हणाले, ‘‘आठ दिवसांत आणखी एक बैठक घेऊन नव्याने येणाऱ्या प्रस्तावांची छाननीही करावी. त्या अगोदर कारखान्यांना कळवून त्यांच्याकडील ऊसतोड कामगारांबाबतचे अपघात अथवा इतर घटनांबाबतची माहिती मागवून त्यांचे परिपूर्ण प्रस्ताव घ्या.

तसेच संबंधित कारखानदारांचे प्रमाणपत्रही घेऊन सर्व माहिती कळवल्याचे लेखी स्वरूपात घेऊन कोणीही या योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी.’’ अशाच प्रकारे ऊस तोडणी मोसमातील ऊसतोड कामगारांच्या अपघाताबाबतची माहिती दरवर्षी कारखानदारांकडून घेण्याची प्रक्रिया राबवावी याबाबतही त्यांनी सूचना केल्या. अपघात नोंदणीसाठी एक नोडल अधिकारी नेमून त्यासाठी त्रयस्थ संस्थेचेही मदत घ्या.

...असे मिळते अनुदान

या योजनेअंतर्गत झोपडी आणि सामग्रीला आग लागल्यास दहा हजार रुपये सानुग्रह अनुदानाची रक्कम दिली जाते. वैयक्तिक अपघातामध्ये मृत्यू झाल्यास त्या कामगाराच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये सानुग्रह अनुदान दिले जाते. अपघातात अपंगत्व आल्यास अडीच लाख सानुग्रह अनुदान, अपघातावेळी वैद्यकीय खर्चासाठी ५० हजार रुपये, बैल जोडी मृत्यू (लहान) पंचाहत्तर हजार रुपये, बैलजोडी (मोठी) एक लाख रुपये असे सानुग्रह अनुदान देण्याची योजना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update: माॅन्सून गोव्यात दाखल; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Agriculture Workshop: सघन कापूस लागवडीवर केळीवेळी येथे मार्गदर्शन

Jalyukt Shivar Abhiyan: 'एल निनो'चं संकट; 'जलयुक्त शिवार'साठी १७० कोटी निधी, प्रत्येक जिल्ह्याला मिळणार ५ कोटी

Fertilizer Shop License Suspension: अकोला जिल्ह्यात सात कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द

Fertilizer Complaints Helpline: खतविषयक तक्रार निवारणासाठी तालुकानिहाय हेल्पलाइन सुविधा

SCROLL FOR NEXT