Sugarcane Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Cultivation : बियाण्यांअभावी ऊस लागण रखडली

Sugarcane Seedling : रहिमतपूर परिसरात अचानक मागणी वाढल्याने रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Satara News : यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी पुन्हा ऊस लागवडीकडे वळल्याचे चित्र आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रोपांची मागणी वाढली आहे. रहिमतपूर परिसरात अचानक मागणी वाढल्याने रोपांचा तुटवडा निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षात कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे ऊसलागवड क्षेत्र कमी होते. यामुळे सध्या ऊस बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना व नर्सरी चालकांना कसरत करावी लागत आहे. मशागत करून तयार असलेली जमीन उसाची रोपे नसल्याने लागवडीवाचून खोळंबली आहे.

रोपांच्या तुटवड्याने बळीराजाला ऊस लागवडीसाठी नर्सरीमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. बियाण्यांसाठी ऊस मिळत नाही, ऊसतोडणी करून कांड्या लागवडीसाठीही मजूर मिळत नसल्याने शेतकरी द्विधा मनःस्थितीत आहे.

रोपांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, थंडीने रोपे तयार होण्यासाठी २० ते २५ दिवसांचा कालावधी लागत आहे. सध्या एक ते दीड महिन्यांचे रोपांचे बुकिंग झाले असल्याचे नर्सरी चालक सांगत आहेत.

रोपाच्या तुटवड्याने रोपाच्या दरातही वाढ झाली आहे. ऊस बियाणे व रोपांसाठी शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

गेल्या वर्षी पाण्याअभावी कमी प्रमाणात ऊस लागवड झाल्याने बियाणे तुटवडा निर्माण झाला आहे. यंदा उसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढल्याने शेतकरी व नर्सरीसाठीही ऊस बियाण्याचा तुटवडा जाणवू लागला आहे.
- राहुल चव्हाण, समर्थ हायटेक नर्सरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT