Sugarcane Cultivation : ‘चिकोत्रा’ कोरडी; ऊस लावण खोळंबली

Chikotra River : चिकोत्रा नदी आता कोरडी झाली आहे. अद्याप प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन झालेले नाही.
Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation Agrowon
Published on
Updated on

Kolhapur News : चिकोत्रा नदी आता कोरडी झाली आहे. अद्याप प्रकल्पातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन झालेले नाही. कालवा समितीची बैठक झाल्यानंतर हे नियोजन ठरते. सध्या शेतकऱ्यांची ऊस लावण सुरू असल्याने पाण्याची गरज आहे. ही बैठक होऊन नियोजन जाहीर करावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

यावर्षीही चिकोत्रा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलाच, शिवाय परतीचा पाऊस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहिला. याचा लाभ उसाला महिनाभर झाला. आता ऑक्टोबरपासून नवीन उसाच्या लावणी होत असतात. नेमके या काळात नदीपात्र कोरडे झाले आहे.

तात्पुरती सुविधा म्हणून पाटबंधारे विभागाने आठवड्यात काही प्रमाणात पाणी सोडले होते; मात्र ते चारच दिवसांत संपले असून नदी कोरडी पडली आहे. चिकोत्रा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या २९ बंधाऱ्यांपैकी प्रकल्पापासून कापशीपर्यंतचे बंधारे लहान आहेत. क्षमता कमी असल्याने ते लगेच कोरडे पडतात. याचाही विचार झाला पाहिजे.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation: ऊसामधील बटाटा लागवड तंत्र

दरवर्षी परतीच्या पावसानंतर नदीपात्रातून वाहणारे पाणी काही प्रमाणात अडवले जाते. हे कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात पूर्ण क्षमतेने न अडवता या बंधाऱ्याचे लोखंडी बर्गे ५० टक्के घातले जातात. यामध्ये साठणारे पाणी आणखी पंधरा दिवसांपर्यंत शेतकऱ्यांना वापरता येते. यावर्षी पाटबंधारे विभागाचा असा प्रयोग दिसला नाही.

परिणामी प्रकल्पातून काही प्रमाणात गेल्या आठवड्यात पाणी सोडावे लागले. यावर्षीच्या प्रकल्पाच्या संपूर्ण पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन अद्याप झालेले नाही. एका आवर्तनाला सुमारे १२० दशलक्ष घनफुटांपर्यंतचे पाणी लागते. अशी सहा ते सात आवर्तने होतात.

Sugarcane Cultivation
Sugarcane Cultivation : आडसाली ऊस लागवडीला पावसाचा फटका

त्यातून एप्रिलपर्यंत खरीप आणि रब्बी पिकांच्या शेतीसाठी पाणी सोडले जाते. काही साठा जूनपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवला जातो. अशा पद्धतीने या पाण्याच्या आवर्तनाचे नियोजन होते. या काळात उपसाबंदीही असते. त्यामुळे ते शेतकऱ्यांना अगोदर समजणे आवश्यक असते. नियोजन त्वरित जाहीर करावे, अशी मागणी शेकऱ्यांकडून होत आहे.

चिकोत्रा प्रकल्पातील पाण्यासाठी लवकरच कालवा समितीची बैठक घेऊन आवर्तने जाहीर केली जातील.
- महेश चव्हाण, उपअभियंता, पाटबंधारे विभाग

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com