Sugarcane Crushing Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : राज्यातील १२० साखर कारखान्यांचा पट्टा पडला

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : राज्यात मार्चअखेर २०७ पैकी १२० साखर कारखाने बंद झाले आहेत. विशेष म्हणजे हंगामाच्या अंतिम टप्प्यात साखर उताऱ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी वाढ झाल्याचे चित्र आहे. मार्चअखेर राज्यात १०५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

साखर उत्पादन आता गेल्या वर्षीपेक्षा अधिक झाले आहे. गेल्या वर्षी या कालावधीत १०४ लाख टन साखर तयार झाली होती. गेल्या वर्षी तब्बल १८८ कारखाने बंद झाले होते. राज्यात अजूनही ८७ कारखाने सुरू असल्याने यंदाचा हंगाम एप्रिलच्या उत्तरार्धापर्यंत चालेल अशी शक्यता आहे.

कोल्हापूर विभाग सर्वांत अधिक म्हणजे ११.५३ टक्के उतारा मिळवत साखर उत्पादनात अग्रेसर आहे. या विभागात २७ लाख टन साखर तयार झाली आहे. या खालोखाल पुणे विभागात २३ लाख टन साखरेची निर्मिती झाली. सोलापूर विभागात १९ लाख टन, तर अहमदनगर विभागात १३ लाख टन साखर तयार झाली.

सोलापूर विभागात सर्वाधिक ३८ साखर कारखाने बंद झाले आहेत. तर कोल्हापूर विभागात २० कारखाने बंद झाले आहेत. कोल्हापूर, पुणे अहमदनगर विभागात अजून ५० टक्के साखर कारखाने सुरू आहेत. यामुळे यंदाचा हंगाम एप्रिलच्या उत्तरार्धापर्यंत चालू शकतो, अशी शक्यता आहे.

वाढते ऊन उसाच्या तोडणीला मोठे अडथळे ठरत आहे. उन्हामुळे ऊसतोडणी कामगार कमी होत असल्याने शिल्लक ऊस तोडण्यासाठी कारखान्यांना शिल्लक मजुरांची जुळवाजुळव करावी लागत असल्याचे चित्र आहे. अनेक कारखान्यांनी यंत्राने तोडणीला जादा प्रमाणात प्राधान्य दिल्याचे चित्र अंतिम टप्प्यात आहे.

गेल्या वर्षी या कालावधीत साखर कारखाने बंद होण्याचा वेग जास्त होता. यंदा मात्र हा वेग कमी असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी अंतिम टप्प्यात साखर उत्पादन कमी झाले होते. ९.९८ टक्के उतारा होता. यंदा मात्र साखर उतारा दहा टक्क्यांच्या वर गेला आहे. राज्यात अजूनही चार ते पाच लाख टन साखर तयार होण्याची शक्यता असल्याचे साखर उद्योगातून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT