Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : खानदेशात ऊस गाळप १३ लाख टनांवर

Sugarcane Season : खानदेशात यंदा ऊस गाळपात पाऊस किंवा इतर समस्यांमुळे कुठेही व्यत्यय आलेला नाही. सहा साखर कारखाने वेगात सुरू आहेत.

Team Agrowon

Jalgoan News : खानदेशात यंदा ऊस गाळपात पाऊस किंवा इतर समस्यांमुळे कुठेही व्यत्यय आलेला नाही. सहा साखर कारखाने वेगात सुरू आहेत. यामुळे गाळपासाठी उसाला उठाव आहे. गाळप वेगात सुरू आहे. १३ लाख टनांवर ऊस गाळप झाल्याची माहिती आहे.

यंदा मार्चअखेरीस गाळप पूर्ण होईल, अशी स्थिती आहे. उसाची लागवड नंदुरबारात सर्वाधिक १३ हजार हेक्टरवर झाली होती. जळगाव जिल्ह्यातही सुमारे ११ हजार हेक्टरवर ऊस पीक आहे. तर धुळ्यातही सुमारे अडीच हजार हेक्टरवर ऊस आहे. धुळ्यात शिरपूर व साक्रीत ऊस आहे.

नंदुरबारात तळोदा, शहादा, अक्कलकुवा व नवापूर तालुक्यांत ऊस आहे. जळगावात चाळीसगाव भागात सर्वाधिक ऊस आहे. तसेच यावल, मुक्ताईनगर, चोपडा या भागांतही ऊस पीक आहे. ऊस गाळपास वेग आला आहे.

कारण यंदा तोडणी सर्वत्र सातत्याने सुरू आहे. पाऊस किंवा इतर अडचणी आलेल्या नाहीत. यंदा तोडणी उशिरा सुरू झाली. मात्र कारखाने सहा सुरू आहेत. त्यामुळे गाळप १० लाख टनांवर झाले आहे. मागील हंगामात डिसेंबरच्या अखेरीस ११ लाख टन ऊस गाळप झालेले नव्हते.

शिवाय चाळीसगाव, साक्री, शिरपूर भागांत बाहेरील कारखान्यांनी ऊस खरेदी किंवा तोडणी केली होती. यंदा फक्त साक्री तालुक्यात नाशिकमधील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. इतर भागात खानदेशातील कारखाने ऊस तोडणी करीत आहेत. सर्वाधिक गाळप नंदुरबारातील कारखान्यांनी केले आहे. समशेरपूर येथील खासगी कारखाना गाळपात खानदेशात आघाडीवर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

E-Peek Pahani: शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलं! ई- पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल, सहायकांची नियुक्ती, शासन निर्णय जारी

Farmer Fraud: शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करा

Pikvima Scam: पीकविमा अर्जासाठी सीएससी चालकांकडून शेतकऱ्यांची लूट

Dairy Farming: नवतंत्रज्ञानातून दुग्ध उत्पादनात वाढ शक्य

Pik Vima Dharashiv: गतवर्षीच्या खरिपातील पीकविम्याचा मार्ग मोकळा

SCROLL FOR NEXT