Sugar Factory Election Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing Season : मराठवाडा व खानदेशातील पाच जिल्ह्यांमध्ये ऊस गाळप पूर्ण

Sugarcane Season 2025 : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्ह्यातील गतवर्षाच्या ऊस काळपाच्या तुलनेत यंदा सुमारे १८ लाख ६१ हजार टन उसाचे गाळप कमी झाले.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील तीन व खानदेशातील दोन जिल्ह्यातील गतवर्षाच्या ऊस काळपाच्या तुलनेत यंदा सुमारे १८ लाख ६१ हजार टन उसाचे गाळप कमी झाले. त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही सुमारे २४ लाख ३० हजार क्विंटलची घट नोंदविली गेली आहे. २१ मार्चला शेवटचे दोन कारखाने बंद झाल्यानंतर उसाचे गाळप आटोपल्याचे स्पष्ट झाले.

गतवर्षीच्या ऊस गाळप हंगामात मराठवाड्याची छत्रपती संभाजी नगर जालना बीड व खानदेशातील नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्यांच्या मिळून २३ कारखान्यांनी गाळपात सहभाग घेतला होता. त्यामध्ये १४ सहकारी तर ९ खासगी साखर कारखान्यांचा समावेश होता.

गतवर्षी २३ कारखान्यांनी सुमारे ९८ लाख ९२ हजार ६२३ टन उसाचे गाळप करत सरासरी सुमारे ८.९६ टक्के साखर कारखान्यांनी ८८ लाख ६१ हजार ४४६ क्विंटल साखरेचे उत्पादन केले होते. यंदा मात्र गाळपासाठी ८० लाख ३१ हजार ३१ हजार ५४० टन ऊस गाळपासाठी उपलब्ध झाला. या उसाच्या गाळपातून सरासरी ८.०१ टक्के साखर उताऱ्याने केवळ ३४ लाख ३१ हजार १०५ टन साखरेचे उत्पादन झाले.

तीन-साडेतीन महिने चालला हंगाम

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगरसह जालना, बीड तसेच खानदेशातील नंदुरबार व जळगाव या पाचही जिल्ह्यातील कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम आटोपला आहे. साधारणतः तीन ते साडेतीन महिने यंदा ऊस गाळप हंगाम चालला.यंदाच्या ऊस गाळप हंगामात पाचही जिल्ह्यातील २२ कारखान्यांनी सहभाग घेतला होता.

त्यामध्ये १३ सहकारी तर ९ खासगी कारखान्यांचा समावेश होता.१३ सहकारी साखर कारखान्यांनीं ३४ लाख ५८ हजार ३२७ टन उसाचे गाळप केले. या कारखान्यांनी सरासरी ७.८३ टक्के साखर उताऱ्याने २७ लाख ८ हजार ५१५ साखरेचे उत्पादन केले. ९ खासगी कारखान्यांनी ४५ लाख ७३ हजार ३१३ टन उसाचे गाळप करत सरासरी ८.१४ टक्के साखर उताऱ्याने ३७ लाख २२ हजार ५९९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.

जिल्हा कारखाने ऊस गाळप (टन) साखर (क्विंटल)

नंदूरबार २ ७८८१२० ५००९००

जळगांव १ १०४३२९ १०५०५०

छ.संभाजीनगर ७ १८५२२१४ १८८०९८९

जालना ४ २१०९८१६ १७८०९००

बीड ८ ३१७७०६१ २१६३२६६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Rain Forecast: गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार; राज्यात आज आणि उद्या पावसाची उघडीप राहण्याची शक्यता

Nepal Youth Protests: नेपाळ संसदेला घेराव, राष्ट्रपती भवनावर कब्जा; पंतप्रधान ओलींनी दिला राजीनामा

PM Kisan Maandhan Scheme: वृद्धापकाळात शेतकऱ्यांना मिळणार मासिक ३ हजार रुपये पेन्शन; केंद्र सरकारची आर्थिक आधार देणारी योजना!

Papaya Cultivation : पपईत पाणी निघत असल्याने चिंतेत भर

Sericulture : सोलापूर जिल्ह्यात रेशीम विभागाचे ‘रेशीम आपल्या दारी’ अभियान

SCROLL FOR NEXT