Sugarcane Bill agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Bill : ऊसदराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला इशारा

Sugarcane Rate : उसाला ३ हजार ७०० रूपयाची पहिली उचल द्या. यासंदर्भात कारखानदार व संघटनांची तातडीने बैठक लावावी अशी मागणी स्वाभिमानीने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

sandeep Shirguppe

Swabhimani Shetkari Sanghatana : विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता राज्य सरकारने तातडीने करावी. तसेच गतवर्षी तुटलेल्या उसास दुसरा हप्ता २०० रूपये व चालू वर्षीच्या तुटणाऱ्या उसाला ३ हजार ७०० रूपयाची पहिली उचल द्या. यासंदर्भात कारखानदार व संघटनांची तातडीने बैठक लावावी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे बुधवारी(ता.०१) करण्यात आली.

निवेदनाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, मागील ५ वर्षात केंद्र व राज्य सरकारच्या धोरणामुळे शेतकरी रसातळाला गेला आहे. त्यातच सोयाबीन, कापूस, तूर, दूध, साखर, डाळी आदींच्या पडलेल्या दरामुळे शेतकरी मातीमोल झालेला आहे. उत्पादन खर्चापेक्षा कमी किंमतीत शेतकऱ्यांना आपला शेतीमाल विकावा लागत आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झालेली आहे. डी.ए.पी. मध्ये पुन्हा २५० रूपयांची वाढ झालेली आहे. किटनाशके, तणनाशकांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली आहे.

सरकार हमीभाव जाहीर करते. पण हमीभावाचा कायदा अस्तित्वात नसल्याने शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किंमतीत शेतीमाल विकावा लागत आहे. परिणामी गेल्या ५ वर्षात शेतकऱ्यांचे कर्ज हे दुप्पट झालेले आहे. एका बाजूला केंद्र सरकार देशातील कार्पोरट कंपन्यांचे १० लाख कोटींच्या कर्जाचा निर्णय घेत ते कर्ज राईट ऑफ करत आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे कर्ज दुप्पट होते हे अतिशय दुर्देवी गोष्ट आहे. महायुती सरकारला शेतकऱ्यांनी भरभरून मते दिलेली आहेत. राज्य सरकारने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आपला दिलेला शब्द पाळून संपूर्ण कर्जमाफी करण्याची मागणी करत असल्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजित पोवार, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष धनाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजाराम देसाई, जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाटील, विक्रम पाटील, सचिन शिंदे, कोल्हापूर शहराध्यक्ष संदीप चौगुले , सुरेश म्हाऊंटकर ,तानाजी मगदूम , नामदेव भराडे, बसगोंडा बिराजदार , विशाल चौगुले यांचेसह कोल्हापूर जिल्ह्यातील स्वाभिमानीचे पदाधिकारी ऊपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raghav Chadha: 'ऑपरेशन लोटस'! 'आप'मध्ये उभी फूट; राघव चड्ढांसह ३ खासदारांच्या हाती कमळ, १० पैकी ७ खासदार 'भाजप'मध्ये विलीन?

Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य

El Nino Impact Agriculture: यंदा एल निनोचे सावट; भूजल पुर्भरण गरजेचे!

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

SCROLL FOR NEXT