Sugar Quota agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

Sugar Rate : कोटा घोषीत होताच येथील बाजारात एस ३० ग्रेड साखरेचे दर किंवटलला २० रुपयांनी कमी झाले.

sandeep Shirguppe

Sugar Market Rate : केंद्र सरकारकडून प्रत्येक महिन्याला साखरेचा कोटा जाहीर केला जातो. दरम्यान मे महिन्याचा कोटा केंद्राकडून जाहीर करण्या आला आहे. या महिन्यात साखरेचा २७ लाख टनांचा मुबलक कोटा जाहीर केला आहे. मागच्या महिन्याच्या तुलनेत यंदा साखरेचा कोटा वाढवण्यात आला आहे. या महिन्यात मोठ्या प्रमाणात साखरेचा पुरवठा होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

उन्हाळा, लग्नसराई, यात्रा-जत्रांमुळे साखरेला मागणी चांगली राहण्याची अपेक्षा आहे. परंतु घोषीत कोटा मोठा असल्याने साखरेचा दर जैसे तेच राहणार आहे असल्याने घाऊक बाजारात मंदी असल्याचे समोर येत आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरेच्या दरवाढीस आळा बसावा म्हणूनच हा 'इलेक्शन कोटा' असल्याची कुजबुज बाजारपेठेत सुरू झाली आहे.

केंद्र सरकारने मार्च महिन्यासाठी २३.५० लाख टन, एप्रिल महिन्यासाठी २५ लाख टन साखरेचा कोटा खुला केला होता. यंदा उन्हाळ्याची तीव्रता प्रचंड आहे. त्यामुळे शीतपेय उत्पादकांकडून साखरेच्या खरेदीचे प्रमाण वाढले आहे.

शिवाय दरवर्षीच उन्हाळ्यात साखरेला मागणी वाढत राहते. या सर्व गोष्टींचा विचार करून एप्रिल महिन्याइतकाच म्हणजे २५ लाख टनाएवढाच कोटा येण्याची अपेक्षा बाजारपेठेला होती. मात्र, तब्बल २७ लाख टन साखर खुली केल्यामुळे साखरेच्या दराचे गणितच बदलल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

कोटा घोषीत होताच येथील बाजारात एस ३० ग्रेड साखरेचे दर किंवटलला २० रुपयांनी कमी झाले. बाजारपेठेतील घाऊक दर क्विंटलला ३८२५ ते ३८७५ रुपये होता, तर किरकोळ बाजारात साखरेची प्रतिकिलोची विक्री ४० रुपये दराने होत असल्याचे सांगण्यात आले.

साखर दरवाढ होणार नाही यावर कटाक्षाने लक्ष चालूवर्ष २०२३-२४ मधील साखर कारखान्यांचा ऊसगाळप हंगामही संपुष्टात आला आहे. त्यामुळे उत्पादनाची आकडेवारी समोर येत आहे. त्यातच १ मे पासून मे महिन्यातील घोषित कोट्यातील साखरेच्या निविदा सुरू होण्याची अपेक्षा आहे.

निविदांमधील चढ-उतार पहिल्या आठवड्यात कसा राहतो, याकडे बाजारपेठेचे लक्ष लागले आहे. मात्र, साखरेचे दर क्विंटलमागे ५० रुपयांनी घटण्याचा अंदाज जाणकार व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर साखरेची दरवाढ होणार नाही, याकडे केंद्र सरकार कटाक्षाने लक्ष देत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Godavari River Basin : गोदावरी खोरे मोठे, मात्र तुटीचे खोरे

Agriculture Irrigation Scheme: शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार ४ लाखांपर्यंत अनुदान; सिंचन क्षेत्र वाढीसाठी सरकारची योजना

Post-Harvest Packaging : किरकोळ ग्राहकांपर्यंत शेतीमाल पोहोचविण्यासाठी पॅकेजिंग

Orchard Farming : नवीन फळझाडांची रोपे, कलमांची निवड

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

SCROLL FOR NEXT