Sugarcane Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Industry : साखर कारखान्यांचे अड्डे जाम

Sugar Mills Production Halt : पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांपुढे आता ऊस तोडणी यंत्राच्या तोडणीमुळे वेगळीच समस्या उभी राहात आहे. उसाची तोडणी जलद गतीने होत असल्याने कारखान्यांकडे उसाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांपुढे आता ऊस तोडणी यंत्राच्या तोडणीमुळे वेगळीच समस्या उभी राहात आहे. उसाची तोडणी जलद गतीने होत असल्याने कारखान्यांकडे उसाची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. एकदम ऊस येत असल्याने कारखान्याचे ऊस अड्डे जाम होत आहेत. गाळप क्षमतेपेक्षा जास्‍त ऊस कारखान्याकडे येत असल्याने तोडणी हळू करण्याचे आदेश ऊस तोडणी यंत्रणेला द्यावे लागत आहेत.

मजूर टंचाईमुळे यंदा अनेक कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्राला प्राधान्य दिले. गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट तिप्पट प्रमाणात यंदा ऊस तोडणी यंत्रे शिवारात ऊस तोडणीचे काम करत आहेत. शेजारच्या शेतात ऊस तोडणी सुरू असेल, तर तोडणी क्रम नसलेला ऊस उत्‍पादकही लगेच ऊस तोडणी यंत्र शेतात आणून उसाची तोडणी करत आहे. यामुळे अनेक ठिकाणी सलग प्लॉटची तोडणी गतीने होताना दिसते.

यामुळे कालावधीनुसार ऊस तोडणीचा क्रम फारसा पाळला जात नसल्याचे चित्र आहे. साधारणतः एक एकर ऊस मजुरांनी तोडायचा झाल्यास चार ते पाच दिवस लागतात. तोच ऊस यंत्राने एका दिवसाच्या आत तोडला जातो. यामुळे ऊस तोडणी लवकर आटोपत आहे. याचा ताण मात्र कारखान्याच्या गाळप यंत्रणेवर येत आहे. यामुळेच काही कारखान्यांनी यंत्राने ऊस तोडणी करणाऱ्या यंत्रणेला हळू ऊस तोडणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

यंत्र मालकांचे नुकसान

यंदा पहिल्यांदाच ऊस तोडणी यंत्रधारकांना पुरेसे काम मिळाले आहे. जास्तीतजास्त ऊस तोडून यंत्रधारक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण कारखान्यांच्या या सूचनांमुळे यंत्राने ऊस तोडणी मंद झाल्यास त्याचा परिणाम अपेक्षित खेपांवर होत आहे. अड्डे जाम राहात असल्याने ट्रॉली अभावी यंत्र मोकळे असूनही ऊसतोडणीला मर्यादा येत असल्याने त्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

यंदाचा ऊस हंगामाचा हळूहळू उत्तरार्धाकडे जात आहे. अशी परिस्थिती किमान पंधरा दिवस ते तीन आठवडे राहील असा अंदाज कारखाना प्रतिनिधींचा आहे. कर्नाटकातील काही यंत्रे महाराष्ट्रातील कारखान्याकडे आल्याने ऊस तोडणीची गती वाढली आहे. यामुळेच दिवसाला प्रमाणापेक्षा जास्त ऊस साखर कारखान्याकडे येत असल्याचे कारखाना सूत्रांनी सांगितले.

अडचणीतल्‍या उसाची तोडणी करणे जिकिरीचे

जो ऊस पूर्ण पडलेला आहे. किंवा तोडणी यंत्र जाणे जिथे शक्य नाही तिथे मजुरांशिवाय पर्याय नाही. अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांना ऊस तोडणी करून घेण्यासाठी कसरत करावी लागत आहे. आर्थिक तडजोडीबरोबर मजुरांची मनधरणी करावी लागत असल्याचे चित्र ऊस पट्ट्यात आहे. यामुळे ऊस तोडणी गतीने होऊन सुद्घा मजुरांद्वारे होणाऱ्या ऊस तोडणीच्या समस्या कायम असल्याचे चित्र आहे. विशेष करून आडसाली उसाची तोड वेळेत करून घेणे शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT