Sugarcane Seasoon Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : साखर हंगाम अंतिम टप्प्यात, पण एकरकमी ‘एफआरपी’कडे कारखान्यांचा काणाडोळा

Sugar Factory : अपुऱ्या उसाभावी यंदाचा हंगाम झपाट्याने अंतिम टप्प्यात येत असला, तरी एफआरपीच्या पातळीवरही समाधानकारक दृश्‍य नसल्याचे यंदाचे चित्र आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : अपुऱ्या उसाभावी यंदाचा हंगाम झपाट्याने अंतिम टप्प्यात येत असला, तरी एफआरपीच्या पातळीवरही समाधानकारक दृश्‍य नसल्याचे यंदाचे चित्र आहे. हंगाम संपण्यास केवळ एक महिन्याचा कालावधी उरला आहे. या पार्श्‍वभूमीवर १५ फेब्रुवारीअखेर राज्यातील केवळ ६५ साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी अदा केली आहे.

हंगाम सुरू केलेल्या १९९ साखर कारखान्यांपैकी १३४ साखर कारखान्यांची एफआरपीची रक्कम अद्याप प्रलंबित आहे. पश्‍चिम महाराष्ट्रातील कारखाने वगळता राज्यातील अन्य कारखान्यांकडे मोठ्या प्रमाणात एफआरपी प्रलंबित आहे. एक रकमी एफआरपी वरून न्यायालयीन लढा पेटलेला असतानाच शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यास कारखाने काणाडोळा करत असल्याची सध्याचे चित्र आहे.

८० ते ९९ टक्के एफआरपी ५३ कारखान्यांनी दिली आहे. ६० ते ७९ टक्के एफआरपी ३९ तर......... साठ टक्के एफआरपी ४२ कारखान्याकडे प्रलंबित आहे. तोडणी वाहतूक खर्चासह आतापर्यंत कारखान्यांनी १८ हजार ४८१ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. अजून २७४१ कोटी रुपयांची देणी कारखान्यांनी थकवली आहेत.

८७ टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. दररोज राज्यातील एखादा साखर कारखाना दररोज बंद होत असल्याचे चित्र आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात उसाची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. यामुळे इतर ठिकाणाहूनही ऊस आणून कारखाने फार वेळ चालत असल्याचे कारखाना सुत्रांनी सांगितले.

यंदाच्या हंगामातील गाळप स्थिती (२१ फेब्रुवारी अखेर)

एकूण गाळप : ७६३ लाख टन

साखर उत्पादन : ७० लाख टन

बंद कारखाने : ३८

गेल्या वर्षातील या कालावधीतील अखेरची स्थिती

एकूण गाळप : ८६१ लाख टन

साखर उत्पादन : ८५ लाख टन

बंद कारखाने : ११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sustainable Agriculture Day: डॉ. स्वामिनाथन यांचा जन्मदिवस शाश्‍वत शेती दिन

Sugar Production: देशात जुलैअखेर साखरेचे २५८ लाख टन उत्पादन

Agriculture Department: 'कृषी’तील बदल्यांचा सावळागोंधळ सुरू

Maharashtra Rain Update: विदर्भात विजांसह पावसाची शक्यता

Anti Corruption: विहिरीच्या नोंदीसाठी लाच मागणारा लिपिक ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 

SCROLL FOR NEXT