Sugar Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : सातारा जिल्‍ह्यात २७ लाख क्विंटल साखर निर्मिती

Sugar Market : सातारा जिल्ह्यात एकूण ३१ लाख ५५ हजार ५३२ टन ऊस गाळपाद्वारे २७ लाख ४१ हजार ७६० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे.

Team Agrowon

Satara News : ऊस गाळपाला गती आली असून जिल्ह्यात दिवसाला ३५ ते ४० हजार टन उसाचे गाळप सुरू आहे. जिल्ह्यात एकूण ३१ लाख ५५ हजार ५३२ टन ऊस गाळपाद्वारे २७ लाख ४१ हजार ७६० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. साखर उताऱ्यात संथ गतीने प्रगती सुरू असून सहकारी कारखान्यांची साखर उताऱ्यात आघाडी आहे.

जिल्ह्यात सध्या १५ कारखान्यांकडून उसाचे गाळप सुरू आहे. यामध्ये नऊ सहकारी, तर सहा खासगी कारखान्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात बहुतांश कारखान्यांनी ३००० ते ३१५० रुपये दर या दरम्यान दर जाहीर केला आहे.

यातील अनेक कारखान्यांनी बिले जमा केली आहेत. जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी रविवारपर्यंत (ता. १७) एकूण ३१ लाख ५५ हजार ५३२ टन ऊस गाळपाद्वारे २७ लाख ४१ हजार ७६० क्विंटल साखर निर्मिती झाली आहे. हंगाम सुरू होऊन एक महिना जवळपास संपला असलातरी अजूनही साखर उताऱ्यात संथ गतीने प्रगती सुरू आहे.

सध्या सरासरी ८.६९ टक्के मिळत आहे. सहकारी कारखान्यांचा साखर उतारा खासगी कारखान्यांच्या तुलनेत जास्त येत आहे. सहकारी कारखान्यांचा सरासरी ९.९५ टक्के तर खासगी कारखान्यांचा ७.४३ टक्के साखर उतारा मिळत आहे. गाळपात मात्र संख्येने कमी असतानाही खासगी कारखान्यांनी सहकारी कारखान्यांच्या बरोबरीने सुरू आहे.

सहकारी कारखान्यांनी १५ लाख ७८ हजार ३३७ टन गाळपाद्वारे १५ लाख ७० हजार ३३० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. तर खासगी कारखान्यांनी १५ लाख ७७ हजार १९५ टन गाळपाद्वारे ११ लाख ७१ हजार ४३० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. ऊस तोडमजूराकडून ऊस तोडणीस पैसे न घेण्यासाठी कितीही निर्बध घातले तरी गपचूप पैसे घेणे सुरूच आहे.

मजुरांची डोकेदुखी कायम

ऊस तोडणीसाठी आवश्यक असणारी मजूर यंत्रणा अनेक कारखान्यांची विस्कळीत झाली आहे. मजुरांच्या मुकादमांनी अनेक ट्रॅक्टर मालक शेतकऱ्यांकडून उचल घेऊन गायब होण्याचे प्रमाण अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांची उचल तर गेलीच त्याबरोबर होणारा व्यवसाय बुडणार आहे. या सर्वाचा परिणाम कारखान्यांच्या गाळप होत आहे. ही यंत्रणा विस्कळीत झाल्यावर वेळेत ऊस न तुटण्याबरोबर गाळपासही ऊस कमी पडत असल्याने कारखान्यांची डोकेदुखी वाढली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT