MahaRally Meeting Agrowon
ॲग्रो विशेष

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Team Agrowon

Dhule News : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी शहरात मंगळवारी (ता. ३०) सकाळी सातला मतदार जनजागृती महारॅली काढण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. महारॅलीच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा परिषदेमध्ये व्यापक बैठक झाली.

मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे अध्यक्षस्थानी होते. जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार, उपजिल्हाधिकारी संजय बागडे, महापालिका अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त संगीता नांदुरकर, रोटरी क्लबच्या देवयानी वाघ, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे दिनेश महाले, किशोर पगारे आदी उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी नरवाडे म्हणाले, की जिल्हा समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क करून तृतीय पंथी मतदार, योगा क्लब, सायकलींग क्लब, लायन्स क्लब, वारकरी संप्रदाय आदींना महारॅलीत सहभागी करून घ्यावे. तसेच महारॅलीदरम्यान पार्किंग, पाण्याची व्यवस्था, प्राथमिक उपचाराची व्यवस्था करावी.

महारॅलीत अधिकाधिक मतदारांची संख्या वाढविण्यासाठी विविध सामाजिक संघटना, स्वयंसेवी संस्था आणि शाळा-महाविद्यालयांशी संपर्क साधावा. महारॅलीसाठी हौसिंग सोसायटी, जिल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, माथाडी कामगार, हमाल आदींमध्ये जागृती करून जवळपास पाचशे मतदार महारॅलीत उपस्थितीत राहतील, असे नियोजन केले जाईल असे जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी सांगितले.

माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांनी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निवृत्त शिक्षक आणि मतदारांमध्ये जनजागृती करून सुमारे दोन हजार मतदारांना महारॅलीत सहभागी करून घेण्याचे नियोजन असल्याचे सांगितले.

दोनशे कर्मचाऱ्यांची बाइक रॅली

ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व धुळे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवक, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी आदींना महारॅलीत सहभागी करून घेतले जाईल, असे सांगितले. जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी दिनेश महाले आणि किशोर पगारे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत दोनशे कर्मचाऱ्यांची बाईक रॅली काढण्यात येईल, असे सांगितले. इनर व्हील आणि रोटरी क्लबच्या शंभर महिला मतदार सहभागी होतील, अशी माहिती देवयानी वाघ यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT