ZP Education Agrowon
ॲग्रो विशेष

ZP School : तिवसा जि. प. शाळेच्या बांधकामाबाबत संशय

School Construction : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक मुलांच्या शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे.

Team Agrowon

Amaravati News : गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषदेच्या पूर्व माध्यमिक मुलांच्या शाळेच्या इमारतीचे काम सुरू आहे. बांधकामामध्ये वापरण्यात येत असलेले साहित्य अतिशय निकृष्ट दर्जाचे असून भविष्यात नवीन इमारतीला तडे जाऊन मुलांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती पालकवर्गाकडून व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, दीड महिन्यांपासून खोल्यांचे काम बंद असल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांचे या कामाकडे कमालीचे दुर्लक्ष होताना दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या तिवसा पूर्व माध्यमिक जिल्हा परिषद शाळेला जवळपास दीडशे वर्षे उलटून गेली. येथील जुन्या शाळेच्या खोल्यांना तडे जाऊन भिंती जीर्ण झाल्या.

शाळेवरील कवेलूसह टीनपत्रे गायब आहेत. याबाबत वेळोवेळी ‘सकाळ’ने शाळेच्या जीर्ण झालेल्या इमारती व येथील वास्तव परिस्थिती वृत्तांतून मांडली. अखेर दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर जिल्हा परिषद मुलाच्या नवीन खोल्यांच्या इमारतीसाठी निधीची तरतूद करून दोन खोल्यांच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मात्र दीड महिन्यापासून काम बंद अवस्थेत असून अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याचा आरोप आहे.

दोन कंत्राटदारांकडे काम

तब्बल दीडशे वर्षे जुनी शाळेची इमारत पाडून त्याचे नूतनीकरण करण्यात येत आहे. या ठिकाणी दोन खोल्यांच्या कामाला सुरुवात झाली, परंतु ही कामे दोन वेगवेगळ्या कंत्राटदारांना देण्यात आली. बांधकामात वापरण्यात येत असलेल्या विटा कच्च्या असून वाळूऐवजी गिट्टीची राख, बोगस सिमेंट वापरले जात आहे. कामामध्ये घोळ असताना जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.

येथील सर्व अधिकार हे जिल्हा परिषदेकडे आहेत. तरी येथील कामांची पाहणी करून याबाबत वरिष्ठांना माहिती देण्यात येईल.
- नितीन उंडे, गटशिक्षणाधिकारी, तिवसा
जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांचे बांधकाम नव्याने सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत काळजीपूर्वक बांधकाम होणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत सुरू असलेल्या कामाच्या दर्जाबाबत शंका असून संबंधित विभागाने या कामाची पाहणी करावी. निकृष्ट कामाबाबत सीईओंकडे तक्रार दाखल करू.
- सागर भवते, जिल्हा महासचिव, वंचित बहुजन युवा आघाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Officer: शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस

Nira Bhatghar Dam: मुबलक पाण्यामुळे भोरमधील शेती बहरणार

Ujani Dam: सांडपाण्यामुळे कोंडला ‘उजनी’चा श्वास!

Soybean MSP: सोयाबीन गाठणार हमीभावाचा टप्पा

Pulses Market: तूर, हरभरा बाजारात तेजीचा सूर

SCROLL FOR NEXT