Subboiler  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Management : टणक, चोपण जमिनीसाठी सबसॉयलर

Agriculture Subboiler : सबसॉयलर नांगरटीच्या खोलीच्या दुप्पट अंतरावरून चालवावा. हलक्या, मुरमाड जमिनीमध्ये १.५ फूट, तसेच भारी काळ्या जमिनीत २ ते २.५ फूट खोलीपर्यंत नांगरणी करावी.सबसॉयलरची निवड जमिनीचा प्रकार, पीक पद्धतीनुसार करावी.

Team Agrowon

डॉ. प्रियंका खोले

दर्जेदार पीक उत्पादनासाठी जमिनीची सुपीकता महत्त्वाची आहे. बदलते हवामान तसेच वेगवेगळ्या पीक पद्धती, अति रासायनिक खतांचा वापर, अतिवृष्टी, ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, वेगवेगळ्या सिंचन पद्धतींचा वापर जमिनीच्या सुपीकतेवर होत आहे. सातत्याने मोठ्या व अवजड यंत्रांच्या वापरामुळे जमिनीचा थर कडक होत आहे.

हा कडकपणा कमी करण्यासाठी सब सॉयलरने खोल नांगरट हा उत्तम पर्याय आहे. यामुळे जमीन आतमधून भुसभुशीत होते. साधारण जमिनीच्या प्रकारानुसार ही नांगरट २ ते २.५ फूट खोलीपर्यंत करावी. दोन ते तीन वर्षांतून एकदा खोल नांगरट करावी. कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनानुसार बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनीच्या मशागतीसाठी सबसॉयलरचा चांगल्याप्रकारे वापर केला आहे.

फायदे

जमिनीमध्ये हवा खेळती राहते, जमिनीच्या आतमधील थर विभागला जातो.

जमिनी व पाण्याचे संवर्धन होते.

पिकांना सहजपणे आणि सुलभतेने अन्नद्रव्ये जमिनीतून घेता येतात.

जमिनीत पाणी मुरते. पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते.

पिकांची वाढ चांगली होते, उत्पन्नात वाढ होते.

अति पावसामुळे पिकाचे नुकसान होत नाही. पाणी जमिनीत लगेच मुरते.

सबसॉयलरचा वापर

खोल नांगरटीसाठी ट्रॅक्टरचलित सबसॉयलरचा वापर करावा. यामुळे जमिनीमधील कडक थर फोडला जातो. जमीन भुसभुशीत होते.

सबसॉयलरचा फाळ मजबूत असल्याने जमिनीतील कठीण थर फुटला जातो. सबसॉयलरचा पहिला भाग म्हणजे कटिंग एज, हा जमिनीच्या पृष्ठभागावरून सबसॉयलर आत जाण्यासाठी मदत करतो. दुसरा महत्त्वाचा म्हणजे फाळ.

याची लांबी अडीच फुटापर्यंत असते. हे दोन्ही एका फ्रेमला जोडलेले असतात. ही फ्रेम ट्रॅक्टरच्या थ्री पॉईंटला जोडली जाते. सबसॉयलरचा फाळ कठीण जमीन विभागतो.

सबसॉयलरचे प्रकार

सबसॉयलरचे प्रकार : हे वर्गीकरण हे फाळाच्या संख्येनुसार, आकारमानानुसार आहेत.

फाळांची संख्या : यामध्ये एक फाळ, दोन फाळ, तीन फाळ, पाच फाळ, सात फाळ आणि नऊ फाळ असलेला सबसॉयलर उपलब्ध आहे. एक फाळ सबसॉयलर सोडून बाकी सबसॉयलरमध्ये एक नवीन जोडणी दिलेली असते. यामुळे खोल नांगरटीमधून निघालेली मातीची ढेकळे फोडली जातात.

फाळाचा आकार : जमिनीच्या स्थितीनुसार आणि प्रकारानुसार वेगवेगळ्या आकाराचे सबसॉयलर वापरावेत. जमीन खूपच खडकाळ असेल तर अशा

वेळेस आपल्याला कर्व्ह सबसॉयलरचा वापर करावा लागतो.

फाळाचे कंपन : सिंगल टाइन सबसॉयलरमध्ये दोन प्रकार आहेत. एका प्रकारामध्ये फाळ हा कंपन करतो आणि दुसऱ्या प्रकारामध्ये फाळाचे कंपन होत नाही.

डॉ. प्रियंका खोले, ७७९८१६५०४९ (विषय विशेषज्ञ, कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, सगरोळी, जि. नांदेड)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT