Agriculture Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scheme : गोदाम बांधकाम, बीजप्रक्रिया, पंपसंचासाठी मिळणार अनुदान

National Food Security Abhiyan Scheme : या योजनेमध्ये गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येईल. त्याच्या निकषानुसार अन्नधान्य साठवणुकीसाठी २५० मेट्रिक टन क्षमतेसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येईल.

सुदर्शन सुतार

Solapur News : ‘राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान’ सन २०२४-२५ अंतर्गत अन्नधान्य पिके फ्लेक्झी घटक या घटकांतर्गत गोदाम उभारणी, पंपसंच, बीजप्रक्रिया यंत्रासह अन्य योजनांसाठी वैयक्तिक शेतकरी आणि शेतकरी कंपन्या, शेतकरी गटांसाठी योजना राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

या योजनेमध्ये गोदाम बांधकामासाठी अनुदान देण्यात येईल. त्याच्या निकषानुसार अन्नधान्य साठवणुकीसाठी २५० मेट्रिक टन क्षमतेसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १२.५० लाख रुपये यापैकी जे कमी असेल त्याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. ही बाब बँक कर्जाशी निगडित असून, इच्छुक अर्जदार (शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एफपीओ, एफपीसी) केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राष्ट्रीयीकृत बँकेकडे प्रकल्प सादर करणे आवश्यक आहे.

त्याशिवाय बीजप्रक्रिया संचासाठी अनुदान मिळेल. त्याच्या निकषात उत्पादित बियाण्यावर प्रक्रिया करून दर्जेदार बियाणे उपलब्ध होण्याच्या दृष्टीने शेतकरी उत्पादक संघ, कंपनी यांना बीजप्रक्रिया प्रकल्प उभारणी करण्यासाठी (यंत्रसामग्री ब बांधकामासाठी) प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के किंवा १० लाख रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येईल.

शेतकरी गटासाठी बीज प्रक्रिया ड्रम / यंत्र यासाठीही अनुदान योजना आहे. त्याच्या निकषानुसार बियाण्यास मोठ्या प्रमाणावर बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकरी गटामार्फत बीज प्रक्रिया ड्रम / यंत्र खरेदीसाठी रुपये ८००० प्रति युनिट किंवा किमतीच्या ५० टक्के अनुदान मिळेल.

पाण्याच्या स्रोतापासून शेतापर्यंत पाणी वाहून नेण्यासाठी पाइपही पुरविण्यात येणार आहेत. त्यासाठी ५० टक्के किंवा १५ हजार रुपये प्रति लाभार्थी अनुदान मिळेल. तसेच पंप संच घेण्यासाठीही ५० टक्के किंवा १० हजार रुपये देण्यात येतील. पण यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.

२५ जुलैपर्यंत मुदत

वरील सर्व बाबीसाठी शेतकरी उत्पादक संघ, कंपनी, एपीओ, एपीसी व वैयक्तिक शेतकऱ्यांनी पात्र असणाऱ्या बाबीसाठी तालुकास्तरावर ऑफलाइन, ऑनलाइन पद्धतीने २५ जुलै २०२४ पर्यंत अर्ज करावेत, त्याशिवाय अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रेय गावसाने यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Market Update : अहिल्यानगरच्या बाजारपेठेत तेजी! रताळे, बटाट्यासह पालेभाज्यांना ग्राहकांची मोठी मागणी

Cattle Fodder Camps : पशुधनाचा जीव टांगणीला! चारा छावण्यांबाबत सरकारनं तातडीने निर्णय घ्यावा; बाळासाहेब थोरातांची मागणी

Fodder Management : दुष्काळाचे संकट! पशुधनाला वाचवण्यासाठी करा चारा-पाण्याचे असे अचूक नियोजन

Latur Gaal Upsa Parvanagi: लातूरमध्ये गाळ उपशास ऑनलाइन परवानगी

Marigold Price Crash : सणासुदीला झेंडूच्या फुलांची मातीमोल विक्री; बाजारात शेतकऱ्यांच्या कष्टाची होतेय अवहेलना!

SCROLL FOR NEXT