Biogas Slurry  Agrowon
ॲग्रो विशेष

Biogas Subsidy : सांगलीत १९१ बायोगॅसचे अनुदान दीड वर्षापासून थकित

Agriculture Scheme : जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात १९१ लाभार्थ्यांनी बायोगॅसचा लाभ घेतला. बायोगॅसचे ३० लाखांचे अनुदान मार्चअखेर लाभार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम जिल्हा परिषद व पंचायत समिती माध्यमातून राबवला जातो. जिल्ह्यात गेल्या आर्थिक वर्षात १९१ लाभार्थ्यांनी बायोगॅसचा लाभ घेतला. बायोगॅसचे ३० लाखांचे अनुदान मार्चअखेर लाभार्थ्यांना मिळणे अपेक्षित होते. परंतु अनुदान आलेच नसल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले आहेत.

दीड वर्षापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीत कारभारीच नसल्याने गाऱ्हाणी कोणाकडे मांडायची? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शासनाच्या २० कलमी योजनेअंतर्गत ग्रामीण भागात राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम राबवला जातो. पंचायत समितीमार्फत याचे प्रबोधन केले जाते.

यामध्ये लाभार्थ्याने स्वतःचे आर्थिक भांडवल गुंतवणूक करून त्याच्या आवश्यक क्षमतेनुसार आकाराचा बायोगॅस बांधणे गरजेचे असते. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी बँका, पतसंस्था यामधून कर्ज काढून पैशाची जुळवाजुळव करीत बायोगॅसची उभारणी केली. परंतु वर्ष झाले अद्याप अनुदान जमा झालेले नाही. पंचायत समितीतील संबंधित अधिकारीही ‘बघू, वरूनच आलेले नाही, अशी उत्तरे देत आहेत.

जिल्ह्यात एकूण लाभार्थी १९१

रखडलेले अनुदान ३० लाख रुपये

राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम आकार ३ ते ४ घनमीटर

अनुदान

वर्ग केंद्र शासन जिल्हा परिषद एकूण

खुला वर्ग १२ हजार रुपये १० हजार रुपये २२ हजार रुपये

एससी, एसटी २२ हजार रुपये १० हजार रुपये ३२ हजार रुपये

५० टक्क्यांपेक्षा अधिक अनुदान मिळते म्हणून पैशाची जुळवाजुळव करीत बायोगॅसचे बांधकाम केले. महिन्यात अनुदान जमा होइल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्ष होत आले तरी अनुदान जमा झालेले नाही.
- महेश देसाई, बायोगॅस लाभार्थी, ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा.
२०२२-२३ वर्षासाठी सांगलीतील १९१ प्रस्ताव दाखल केले आहेत. त्यांचे अनुदान अद्याप मिळालेले नसून निधी उपलब्ध होताच तत्काळ अनुदानवाटप केले जाईल.
- सचिन देवकर, वरिष्ठ लिपिक, कृषी विभाग, जि. प. सांगली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT