Drip Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Drip Irrigation Subsidy: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ठिबकसाठी अनुदान

RKVY Scheme 2025: राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ‘प्रति थेंब अधिक पीक’ या उपक्रमातून ठिबक सिंचनासाठी शेतकऱ्यांना ८० ते ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया महाडीबीटी पोर्टलवर सुरू असून, शेतकऱ्यांनी लागणारी कागदपत्रे अपलोड करून लवकर अर्ज करावा.

सुदर्शन सुतार

Solapur News: राष्ट्रीय कृषी विकास योजना (आरकेव्हीवाय) ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना असून, तिचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘प्रति थेंब अधिक पीक’ या योजनेचा उद्देश म्हणजे सुक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पाण्याचा कार्यक्षम वापर करणे,

शेतकऱ्यांचे उत्पादन वाढवणे आणि जलसंपत्तीचे संरक्षण करणे, हा आहे. या योजनेतून ठिबक संचासाठी अनुदान देण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना त्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी त्यासाठी आधी महाडीबीटी पोर्टलवर (krishi.maharashtra.gov.in) नोंदणी करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत सातबारा, आठ-अ, आधार, बँक पासबुक, सिंचन स्रोताचा पुरावा, जात प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) जोडावा,

अर्ज छाननीनंतर कृषी विभागाकडून पूर्व-मंजुरी पत्र आणि मान्यताप्राप्त पुरवठादारांकडून बीआयएस मानांकन असलेली प्रणाली खरेदी केलेल्या पावतीसह कृषी विभागाच्या पोर्टलवर मागणी नोंदवावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

८० ते ९० टक्क्यापर्यंत अनुदान

या योजनेत अल्प/अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ठिबक/तुषारसंचला ५५ टक्के, २५ टक्के आणि ८० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळणार आहे. बहुभूधारकाला ठिबक/तुषार संचाला ४५ टक्के, ३० टक्के आणि ७५ टक्केपर्यंत तर SC/ST शेतकऱ्यांना ठिबक/तुषारसंच ६५ टक्के, २५ टक्के, ९० टक्क्यांपर्यंत मिळणार आहे. अधिक माहितीसाठी किंवा मार्गदर्शनासाठी आपल्या तालुका कृषी अधिकारी / जिल्हा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shirdi Highway : अहिल्यानगर-शिर्डी रस्ता भाजपच्या नाकर्तेपणामुळे रखडलाय : पवार

Rainfall Deficit: परभणीत ८७.२, हिंगोलीत ८२.९ मिमी पावसाची तूट

Satara Development : साताऱ्याला अत्याधुनिक जिल्हा बनवणार : पालकमंत्री शंभूराज देसाई

Sugarcane Harvesting Mechanisation: शेतकरी हित आणि सहकाराची परंपरा जपत कारखाना प्रगतिपथावर : आमदार अमित देशमुख

Satara Ration Card : साताऱ्यात ५७ हजार शिधापत्रिका अपात्र

SCROLL FOR NEXT