Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage: जोरदार वाऱ्याने काजू, आंब्याचे मोठे नुकसान; शेतकरी हतबल

Weather Change: सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे आंबा व काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोवळ्या काजू बिया झाडांखाली गळून पडल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात बुधवारी (ता. ५) झालेल्या जोरदार वाऱ्यांमुळे आंबा, काजू पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. काजूच्या कोवळ्या बिया गळून पडल्याने मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात बुधवारी अचानक वातावरणात बदल झाला. पहाटेपासून जिल्ह्याच्या बहुतांशी भागात जोरदार वारे वाहू झाले. पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये वाऱ्याचा वेग अधिक होता. या वाऱ्यांमुळे काजूचे मोठे नुकसान झाले आहे. काजूची कोवळी बी गळून पडली आहे. झाडांखाली कोवळ्या बीचा खच पडला आहे. त्यामुळे अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.

वैभववाडी तालुक्यातील खांबाळे, आर्चिणे, नावळे, सडुरे, शिराळे, कुर्ली, भुईबावडा, करूळ, कुभंवडे या भागात काजू पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. डोंगरपायथ्यांशी असलेल्या गावांमध्ये नुकसानीची झळ अधिक बसली आहे.

आंबा पिकांमध्ये लहान लहान फळांची गळ झाली आहे. तापमानवाढीने अगोदरच मोठे नुकसान झाले होते. त्यातच आता वाऱ्यांमुळे काजूचे नुकसान झाले आहे. दरम्यान कृषी विभागाने नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

काजूपीक संकटातच...

यावर्षी काजूला प्रचंड मोहोर आला होता. त्यामुळे यावर्षी चांगले उत्पादन येईल, अशी अपेक्षा काजू उत्पादकांना होती. परंतु मोहर फुटल्यानंतर धुक्यांचे प्रमाण वाढले. त्यामुळे मोहोर काळवंडला. परंतु त्यातूनही काही बागायतदारांनी विविध बुरशीनाशक, कीटकनाशकांच्या फवारण्या घेऊन मोहर टिकवण्याचा प्रयत्न केला. मात्र तापमानवाढीने नव्याने आलेला मोहर करपून गेला. सध्या काही बागांमध्ये झाडांवर कोवळी बी होती ती आज झालेल्या वाऱ्यांमुळे गळून पडली. त्यामुळे काजू पीक यावर्षी संकटात सापडले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT