Monsoon Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Monsoon Rain : सिंधुदुर्गात मॉन्सूनची जोरदार सलामी

Rain Update : मॉन्सून जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) सकाळी दाखल झाला. सकाळी काही भागांत हलक्या तर काही भागांत जोरदार सरी बरसल्या.

Team Agrowon

Sindhudurg News : जिल्ह्यात मॉन्सूनने जोरदार सलामी दिली असून विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. वैभववाडी आणि देवगडला मुसळधार पावसाने रात्रभर झोडपून काढले. पहाटेपर्यंत पाऊस सुरू होता. शुक्रवारी (ता. ७) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे.

मॉन्सून जिल्ह्यात गुरुवारी (ता. ६) सकाळी दाखल झाला. सकाळी काही भागांत हलक्या तर काही भागांत जोरदार सरी बरसल्या. परंतु दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. सायकांळी सर्वत्र ढगाळ वातावरण होते. रात्री साडेदहापासून जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

वैभववाडी आणि देवगड तालुक्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. देवगड येथे एका घरावर वीज पडून नुकसान झाले. या दोन्ही तालुक्यांत पहाटेपर्यंत जोरदार सरी कोसळत होत्या.

याशिवाय कणकवली, सावंतवाडी तालुक्यात देखील मॉन्सूनच्या चांगल्या सरी बरसल्या. कुडाळ, मालवण, वेंगुर्ला तालुक्यांत देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.=

दरम्यान शुक्रवारी सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असली तरी सर्वत्र ढगाळ वातावरण कायम आहे. काही भागांत पावसाचा शिडकावा झाला. जिल्ह्यात कणकवली तालुक्यात ३५ मिलिमीटर, मालवण २२ मिमी, कुडाळ २० मिमी, सावंतवाडी ३५ मिमी, देवगड ५८ मिमी, वैभववाडी ६२ मिमी, दोडामार्ग तालुक्यात १९ मिमी पावसाची नोंद झाली.

खरीप हंगामाला उद्यापासून प्रारंभ

जिल्ह्यात मॉन्सूनने जोरदार सलामी दिल्यामुळे शनिवारपासून (ता. ८) खरीप हंगामाला प्रारंभ होणार आहे. शनिवारपासून भात रोपवाटिका तयार करण्याच्या कामांना शेतकरी सुरुवात करतील, अशी शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Industry: साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Ice Apple Demand: उन्हामुळे ताडगोळ्यांना मोठी मागणी

Beetroot Farming: वाणगावच्या बीटचा दिल्लीत गोडवा

Animal Crop Damage Issues: मोकाट जनावरांचा धसई परिसरात उच्छाद

Annasaheb Hazare Social Awards: राळेगणसिद्धीत १५ जून रोजी अण्णासाहेब हजारे पुरस्कार

SCROLL FOR NEXT