Fish Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Mangoor Fish Farming : मांगूर मत्स्यपालनावर कठोर कारवाई होणार ः जिल्हाधिकारी

Fish Farming : स्थानिक मत्स्य व्यावसायिकांनी उजनी जलाशयात मासेमारीसाठी आवश्यक परवाना नजीकच्या जलसंपदा विभाग शाखा कार्यालयाशी संपर्क साधून घ्यावा.

Team Agrowon

Pune News : उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी करणारे मत्स्य व्यावसायिक तसेच जलाशयालगत संपादित क्षेत्रात अनधिकृतपणे प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांवर संयुक्त कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

उजनी जलाशयात पुणे जिल्ह्यातील दौंड व इंदापूर, सोलापूरमधील माढा व करमाळा व नगर जिल्ह्यांतील कर्जत व श्रीगोंदा तालुक्यांतील परवानाधारक मत्स्य व्यावसायिक तसेच विनापरवाना मत्स्य व्यावसायिक अनधिकृत लहान मासळी मासेमारी करत असल्याचे आढळून आले आहे.

त्याला प्रतिबंध घालण्याच्या अनुषंगाने डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जलसंपदा विभाग, पोलिस विभाग, महसूल विभाग, मत्स्य व्यवसाय विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि स्थानिक मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी यांच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त कारवाईचे आदेश दिले.

‘लहान मासळी मासेमारी, मांगूरपालन करू नये’

उजनी जलाशयात लहान मासळी मासेमारी करू नये. लहान मासळी मासेमारीकरिता वापरण्यात येणारी जाळी व साहित्य त्वरित नष्ट करावे. प्रतिबंधित मांगूर मत्स्यपालन करणाऱ्यांनी त्यांच्याकडील मांगूर माशांचा साठा नष्ट करावा. उजनी जलाशय संपादित क्षेत्रात असणारी शेततळी नष्ट करण्यात यावीत. संपादित क्षेत्रात अशा प्रकारचा कोणताही गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

मासेमारी करण्यासाठी परवाना बंधनकारक

स्थानिक मत्स्य व्यावसायिकांनी उजनी जलाशयात मासेमारीसाठी आवश्यक परवाना नजीकच्या जलसंपदा विभाग शाखा कार्यालयाशी संपर्क साधून घ्यावा. परवाना नसलेल्या मत्स्यव्यावसायिकांवर विनापरवाना जलाशयात प्रवेश केल्याबद्दल कारवाई करण्यात येईल, असे उजनी धरण व्यवस्थापन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT