Strawberry farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry farming : द्राक्ष नगरीत स्ट्रॉबेरीचा नवा मार्ग! नाशिकच्या आदिवासी पट्ट्यात रोजगाराच्या नव्या दिशा खुलणार

Strawberry farming in Nashik : नाशिक म्हटलं की द्राक्षांच्या बागा आणि बेदाण्यांचे ढिगच्या ढिगचे पाहायला मिळतात. पण आता येथील आदिवासी पट्ट्यात स्ट्रॉबेरी लागवड होत आहे. यामुळे येथील आदिवासी पट्ट्यात रोजगाराच्या नव्या वाटा मोकळ्या होणार आहेत. ज्याचा फायदा येथील आदिवासी समाजातील तरूणांना होईल.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : नाशिक हा जिल्हा प्रामुख्याने द्राक्ष आणि बेदाना उत्पादक जिल्हा आहे. येथे द्राक्षांवर प्रक्रिया करणारे छोटे-मोठे उद्योग ही आहेत. यामुळे मोठा रोजगार आहे. पण याच जिल्ह्यात काही आदिवासी तालूके असून येथे रोजगाराच्या अनेक समस्या आहेत. यादरम्यान या आदिवासी तालुक्यामधून लालचुटुक व तोंडाला पाणी आणणाऱ्या स्ट्रॉबेरीची शेती केली जात आहे. ज्यामुळे येथील आदिवासी समाजातील तरूणांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यांच्यासाठी रोजगाराच्या नव्या वाटा मोकळ्या होणार आहेत.

नाशिक भागात चांगलीच थंडी

सध्या नाशिक भागात चांगलीच थंडी वाढलेली असून हे हवामान स्ट्रॉबेरी शेतीसाठी उपयुक्त आहे. तसेच येथील पेठ, कळवण, सुरगाणा, ननाशी घाटाजवळील काही भाग आणि सापुतरा, सप्तश्रृंगी गडाच्या घाटमाथ्यावरील लाल माती ही स्ट्रॉबेरी लागवडीसाठी उत्तम आहे.

दिडोरी तालुक्यात उत्तम वातावरण

तर दिडोरी तालुक्यातील काही भागांतही स्ट्रॉबेरी पिकांसाठी लागणारे उत्तम वातावरण आणि माती चांगली असल्याने येथे स्ट्रॉबेरीची लागवड केली जात आहे. तर उत्तम हवामानामुळे स्ट्रॉबेरी पिकास चांगला बहर येत आहे.

अजूनही थंडी कायम

येथील तालुक्यांमधून अजूनही थंडी कायम आहे. हे वातावरण स्ट्रॉबेरी पिकासाठी पोषक आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांना याचा फायदा होत असून त्यांना नफाही चांगला मिळत आहे. यामुळे सुरगाणा व कळवण तालुक्यातील शेतकरी आपला माल मुंबई, गुजरात व महाराष्ट्रातील विविध भागांत विक्रीसाठी पाठवत आहेत. तर काही शेतकऱ्यांनी तालुक्यातील वणी, सापुतारासह विविध धार्मिक स्थळांजवळ स्ट्रॉबेरी विक्री स्टॉल लावले आहेत.

रानभाज्यांसह स्ट्रॉबेरीचे आकर्षण

सुरगाणा व कळवण तालुक्यातील काही भागांतील सध्या पर्यटक आणि प्रवाशी थांबत आहेत. याचे कारण फक्त येथे मिळणारी पिके फळे, रानभाज्या असून यात आता लालबुंद स्ट्रॉबेरीची भर पडली आहे. येथे येणाऱ्या-जाणारे प्रवाशांचे लालबुंद स्ट्रॉबेरी लक्ष वेधून घेत आहे. ते स्ट्रॉबेरी घेण्यासाठी थांबत आहेत. यामुळे आदिवासी शेतकऱ्यांना आता स्ट्रॉबेरीतून आर्थिक आधार मिळत आहे.

स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढले

योग्य वातावरण आणि पोषक जमिनीमुळे येथील कळवण, सुरगाणा, पेठ आदी भागांत सध्या स्ट्रॉबेरीचे पिक घेतले जात आहे. तर दिडोरी तालुक्यातील काही भागांत स्ट्रॉबेरी पिकांसाठी योग्य जमिन असल्याने येथे स्ट्रॉबेरीचे क्षेत्र वाढले आहे. येथील शेतकरी नगदी भांडवली पीक म्हणून स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Season 2024 : दामाजी, विठ्ठलराव शिंदे कारखान्यांचा वाहतूक खर्च कमी

Latur Voting Percentage : वाढलेल्या मताच्या टक्क्याचा कोणाला बसणार?

Nashik Assembly Voting : नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.९७ टक्के मतदान

Agriculture Irrigation : सिंचन योजनेतून शेतीसाठी २१ टीएमसी पाणी

GM Mustard : जीएमला परवानगी दिली तर तेलबिया उत्पादन वाढेल; जीएमला परवानगी देण्याची उद्योगांची मागणी

SCROLL FOR NEXT