Strawberry Farming : भीमाशंकर ला फुलतेय लालचुटुक स्ट्रॉबेरीची शेती

Team Agrowon

भीमाशंकर परिसरातील स्ट्रॉबेरी चे क्षेत्र

स्ट्रॉबेरी म्हटले की महाबळेश्वर आठवते, पण आता भीमाशंकर परिसरातील या १६ गावांमधील ४५ शेतकऱ्यांनी ६८ हजार स्ट्रॉबेरी रोपांची लागवड केली आहे.

Strawberry Farming | Agrowon

स्ट्रॉबेरीच्या ५० हजार रोपांचे वाटप

मागील वर्षी या भागातील २५ शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या ५० हजार रोपांचे वाटप आयसीआयसीआय फाउंडेशनकडून मोफत करण्यात आले होते. या लागवडीसाठी सेंद्रिय पद्धत अवलंबली होती.

Strawberry Farming | Agrowon

केवळ मजुरीचा व पॅकिंगचा खर्च

खत व कीटकनाशकांचा खर्च नसल्याने केवळ मजुरीचा व पॅकिंगचा खर्च प्रत्येकी ८ हजार खर्च आला.

Strawberry Farming | Agrowon

आर्थिक उत्पन्न वाढले

स्ट्रॉबेरीचे उत्पन्न ३५ हजार ते दीड लाखापर्यंत मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. स्ट्रॉबेरीचे पीक घेऊन आर्थिक उत्पन्नाची किमया साधली आहे.

Strawberry Farming | Agrowon

नवी दिल्लीवरून रोपांची खरेदी

यावर्षी महाबळेश्वर, पुणे, नाशिक या भागात रोपे उपलब्ध न झाल्याने फाउंडेशनने नवी दिल्लीवरून रोपे मागवून या भागातील ४५ शेतकऱ्यांना प्रत्येकी दीड हजारप्रमाणे ६८ हजार रोपांची व्यवस्था करून दिली.

Strawberry Farming | Agrowon

रोपांच्या खर्चाचे नियोजन

या वेळी मात्र प्रत्येक शेतकऱ्याने रोपांसाठी १ हजार रुपये खर्च केला व रोपांचा उर्वरित खर्च फाउंडेशनने उचलला.

Strawberry Farming | Agrowon

शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी आयसीआयसीआय फाउंडेशनमार्फत मागील वर्षापासून या प्रकल्पास सुरुवात झाली असून शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद या प्रकल्पास मिळत आहे.

Strawberry Farming | Agrowon