Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : माण, पाटण, सातारा तालुक्यांत वादळी पाऊस

Rain Update : सातारा शहरासह माण तालुक्यातील दहिवडी परिसर, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात बुधवारी (ता. २४) दुपारी वळवाने हजेरी लावली.

Team Agrowon

Satara News : सातारा शहरासह माण तालुक्यातील दहिवडी परिसर, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात बुधवारी (ता. २४) दुपारी वळवाने हजेरी लावली. वादळी पावसामुळे ढेबेवाडी परिसरातील २५ हून अधिक घरांचे नुकसान झाले आहे. ठिकठिकाणी विजेचे खांब कोसळले असून, झाडे मोडून पडली आहेत.

दहिवडी शहरात साधारण अर्धा तास पाऊस झाला. त्यानंतर साडेपाचच्या सुमारास सुद्धा पावसाचे थेंब हलक्या प्रमाणात पडत होते. पिंगळी बुद्रुक परिसरात दमदार पाऊस झाला. पाटण तालुक्यातील काळगाव- धामणी (ता. पाटण) परिसराला वादळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.

काळगाव खोऱ्याला वादळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वादळात काळगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची इमारत उद्‌ध्वस्त झाली आहे. विद्यालयाच्या इमारतीचे २००८ मध्ये नूतनीकरण केले होते.

टंचाईकाळात जपलेला आंबा हिरावला

काळगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांच्या आंब्याच्या फळबागा असून, या वर्षी प्रतिकूल वातावरण आणि कडक ऊन असतानाही शेतकऱ्यांनी बागा जपल्या आहेत. सध्या त्यातून उत्पादन सुरू आहे. मात्र वादळी पावसाने अनेक बागांना फटका बसला. झाडांखाली आंब्याचा अक्षरशः सडा पडल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामे करून वादळग्रस्तांना मदतकार्य राबवावे, अशी मागणी काळगावच्या सरपंच राखी पाटील यांनी केली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Students Protest: मांजरीतील आदिवासी विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण; १३व्या दिवशी एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली

Papaya Farming: खानदेशात पपई येतेय काढणीवर

Micro Irrigation: ठिबक अनुदानाबाबत शेतकऱ्यांत संभ्रम

Sugar Prices: साखरेचे दर कमी होतील का? 'इस्मा'नं दिली महत्त्वाची माहिती

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

SCROLL FOR NEXT