Unseasonal Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Unseasonal Rain : नांदेडला अवकाळी पावसाचा तडाखा

Heavy Rain Damage : मुखेड तालुक्यातील होंडाळा येथील एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा शनिवारी (ता. २६) सायंकाळी सात वाजता वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Team Agrowon

Nanded News : मुखेड तालुक्यातील होंडाळा येथील एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा शनिवारी (ता. २६) सायंकाळी सात वाजता वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यासोबतच तीन शेळ्या, एक म्हैस व एका बैलाचा वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून मिळाली.

भारतीय हवामान विभागाने नांदेड जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. शनिवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होऊन अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपून काढले.

हा पाऊस जिल्ह्याच्या अनेक भागात झाला. शनिवारी (ता. २६) सायंकाळी पाचनंतर अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या काळात वीज पडून होंडाळा (ता. मुखेड) येथील खंडू श्यामराव पुटवाड (वय ६५) ही व्यक्ती शेतातून घरी जात असताना अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मुखेडमधील कोळनूर येथील शेतकरी लक्ष्मण विठ्ठलराव पाटील यांची दुभती म्हैस वीज पडल्यामुळे मृत्यू पावली. कौठा (ता. कंधार) येथे वादळी वाऱ्यासह पाऊस होऊन बाळू बालाजी मुंडकर यांच्या दोन शेळ्या व लक्ष्मण संभाजी तेलंग यांची एक शेळी वीज पडून मृत्यूमुखी पडली आहे.

तर रानसुगाव (ता. नायगाव) येथील शेतकरी साईनाथ हनुमंतराव जाधव यांचा बैल शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वीज पडून मरण पावला आहे. पावसादरम्यान वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने अनेक ठिकाणी विजेचे खांब पडून वीज पुरवठा बंद झाला आहे. महावितरणकडून वीज पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT