Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Crop Damage : अकोला जिल्ह्यात १६०७ हेक्टरचे नुकसान; ५७ घरांचीही पडझड

Akola Rain Update : दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील दोन तालुक्यांत १ हजार ६०७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले.

 गोपाल हागे

Akola News : दोन दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील दोन तालुक्यांत १ हजार ६०७ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले. ५७ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल शुक्रवारी (ता. १३) जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाला आहे.

वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात अकोट व बाळापूर या दोन तालुक्यांतील ५८ गावांत १ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावरील पपई, संत्रा, लिंबू, केळी आदी पिकांचे नुकसान झाले.

तर अकोट व मूर्तिजापूर या दोन तालुक्यांत ५७ घरांची पडझड झाल्याचा प्राथमिक अहवाल संबंधित तहसील कार्यालयांकडून सादर झाला. वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील चार गावांत १६ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक आहे.

त्यामध्ये पपई, लिंबू, आदी पिकांच्या नुकसानीचा समावेश असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले.

अहवालानुसार अकोट व बाळापूर या दोन तालुक्यांतील ५८ गावांत १ हजार ६०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले. त्यामध्ये अकोट तालुक्यात १ हजार ४ हेक्टर आणि बाळापूर तालुक्यात ६०३ हेक्टरवरील पिकांचे नुकसानीचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

iPhone Craze: आयफोन नावाचे स्टेट्स सिम्बॉल

Monsoon Diaries: पाऊस आपल्यासारखंच वागतोय...

Wheat Varieties: गव्हाचे तांबेरा आणि करपा रोगासाठी प्रतिकारक वाण

Biodiversity Conservation: विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बळावर जैवविविधतेचे संवर्धन

Weekly Weather: बहुतांशी भागात मुसळधार पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT