Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : नंदुरबारातील नुकसानग्रस्तांना मदतनिधी केव्हा मिळेल?

Storm Affected Farmer : अतिपाऊस व जोरदार वादळी वाऱ्यांमुळे परिसरातील शेकडो एकरातील फळबागांचे नुकसान झाले होते. यातील नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

Team Agrowon

Nandurbar News : काकर्दे खुर्द, काकर्दे दिगर, हिंगणी, तोरखेडा, अभाणपूर, कोंढावळ, खापरखेडा (ता. शहादा) परिसरास नोव्हेंबर २०२३ मध्ये विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाटासह पाऊस झाला होता.

अतिपाऊस व जोरदार वादळी वाऱ्यांमुळे परिसरातील शेकडो एकरातील फळबागांचे नुकसान झाले होते. यातील नुकसानग्रस्तांना अद्याप भरपाई मिळालेली नाही.

केळी, पपई, हरभरा, टोमॅटो, डांगरमळ्यांचे मोठे नुकसान झाले. तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावल्याने शेतकरी अडचणीत आले. महसूल व कृषी विभागाने परिसरातील शेत शिवारात नुकसानीचे पंचनामे केले होते.

शहादा तालुक्यातील काकर्दे दिगर, काकर्दे खुर्द, हिंगणी, तोरखेडा, अभणपूर, खापरखेडा, कोंढावळ परिसरात आठवड्यात दुसऱ्यांदा सुमारे अर्धा तास पाऊस झाला होता. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकरातील फळबागा केळी, पपई अक्षरशः आडवी पडली असून, लागलेली फळे जमिनीवर पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

काकर्दे खुर्द, दिगर शिवारात ढगफुटीसदृश पावसाने, सोसाट्याच्या वाऱ्यासह रुद्ररूप धारण केले होते. पावसासह वाऱ्याच्या तडाख्याने केळी, पपई या पिकांची झाडे पूर्णतः आडवी पडली होती. यामुळे शेतात फळांचा खच पडला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed and Pesticide Act : प्रस्तावित बियाणे आणि कीटकनाशक कायदे पुढील अधिवेशनात मंजुरी सादर करणार: कृषिमंत्री चौहान

Wheat production: देशातील गहू उत्पादनात ५ ते १० घट होण्याची शक्यता, सरकारचा अंदाज चुकणार?

Fertilizer Shop License Suspension: अहिल्यानगर जिल्ह्यातील सहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

Pre Kharif Planning Meeting: कणेरी येथे खरीप हंगामपूर्व नियोजन आढावा बैठक

Agrowon Podcast: बाजरीची आवक स्थिर; सोयाबीन भावात वाढ, कापसाचे दर टिकून, गव्हावर दबाव तर तुरीचे दर स्थिर

SCROLL FOR NEXT