Chhatrapati Shivaji Maharaj Agrowon
ॲग्रो विशेष

Chhatrapati Shivaji Maharaj statue : नागपुरात उभारला जाणार छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांत भव्य पुतळा

Shivaji Maharaj statue : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर उभारला जाणार आहे.

Team Agrowon

Shivaji Maharaj statue Nagpur News : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ भव्य पुतळा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महाराजबागस्थित जागेवर उभारला जाणार आहे. विद्यापीठ शताब्दी निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारणार आहे.

विद्यापीठाच्या स्थापनेला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहे. त्याचे औचित्य साधून या शताब्दी वर्षात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती लोकसहभागातून महाराजांचा सिंहासनारूढ भव्य पुतळा उभारत आहे. हा पुतळा ब्रांझ धातूचा राहणार आहे.

त्याची रीतसर परवानगी महाराष्ट्र शासनाच्या कला व संचालनालय विभागाने दिली आहे. जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ असा हा पुतळा राहणार आहे. महाराजांचा राज्याभिषेक हा भारतासह जगात मानवतावादी लोकशाही व्यवस्था निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न आहे.

त्यामुळे राज्याभिषेकाची आठवण देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा हा जनतेच्या मनात मानवतावादी दृष्टिकोन जागविण्यासाठी प्रेरक ठरणार आहे. अभ्यासक व नागरिकांना प्रगत शिक्षण केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या शिक्षण केंद्रांमध्ये शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व कार्यावर अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे.

...असा आहे पुतळा

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याची लांबी २० फूट, रुंदी १५ फूट असून, उंची ९ फूट आहे. सिंहासनारूढ पुतळ्याची उंची ३२ फूट असून, त्यावरील छत्र ७ फूट आहे. ब्रांझ धातूने बनविण्यात येणाऱ्या पुतळ्याचे वजन १०,००० किलोग्रॅम असेल. पुतळा मूर्तिकार सोनल कोहाड साकारणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT