Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway: ‘शक्तिपीठ’बाबत मुख्यमंत्र्यांनासंघर्ष समितीचे निवेदन

Farmer Issue: सांगली येथील शेतकरी संघर्ष समितीने मुख्यमंत्र्यांना ‘शक्तिपीठ’ महामार्गाबाबत निवेदन देऊन महत्त्वाच्या बाबी मांडल्या आहेत.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News: ‘नागपूर-गोवा शक्तिपीठ’ महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जात आहे. यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त होऊन अनेक अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग रत्नागिरी-नागपूर महामार्गाला जोडावा,’ अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘शक्तिपीठ’बाधित शेतकरी संघर्ष समितीने शुक्रवारी (ता. २३) येथे केली.

या वेळी समितीचे दिगंबर कांबळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली. याबाबत निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती श्री. कांबळे यांनी दिली. जिल्हाध्यक्ष घनश्‍याम नलावडे, शरद पवार (गव्हाण), भूषण गुरव, राहुल जमदाडे, विष्णू सावंत, एकनाथ कोळी, सनी करीम, गजानन सावंत, रमेश कांबळे, प्रकाश पाटील, रवी साळुंखे, दिनकर निकम आदी यावेळी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे, की नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ ला समांतर जात असून, यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी उद्ध्वस्त होऊन अनेक अल्प भूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शक्तिपीठ महामार्ग सांगली जिल्ह्यातील १९ गावांमधून जात आहे.

त्यामधील अनेक गावांतील द्राक्ष, डाळिंब, ऊस व अन्य बागायती पट्ट्यातून हा महामार्ग जात असल्याने शेतकऱ्यांचे कधीही न भरून येणारे नुकसान होणार आहे. तसेच जिल्ह्यातील पूरबाधित नदीकाठावरील गावांमधून हा महामार्ग जात असल्याने पुराचा प्रचंड मोठा धोका निर्माण होऊन अनेक गावेच स्थलांतरित करावी लागण्याची शक्यता आहे.

महामार्गाला टाकलेल्या उंच भरावाला पाणी थांबून अन्य शेतीही नापिक होण्याचा धोका आहे. आधीच जिल्ह्यामध्ये अस्तित्वात असलेला रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून अतिशय कमी प्रमाणात वाहनांची रहदारी आहे. त्याच महामार्गाला आपला नियोजित महामार्ग जोडावा, जेणेकरून शेतकऱ्यांच्या जमिनी वाचतील व राज्य सरकारचा मोठ्या प्रमाणात निधी वाचेल. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या महामार्गाला दुसरा समांतर महामार्ग करण्यात येऊ नये, अशी मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Scheme: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ मध्ये ग्रामीण महिलांसाठी 'एसएचई मार्ट' या योजनेची घोषणा!

Wild Boar Attack: रानडुकराच्या हल्ल्यात पती-पत्नी गंभीर जखमी

Farm Road: शेत पाणंद रस्ते योजनेत गुणवत्ता, वेळेला प्राधान्य द्या

Union Budget 2026 : पशुधनासाठी कर्ज-संलग्न भांडवली अनुदान सहाय्य देण्याची अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची घोषणा

Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्पात मोठी घोषणा; देशात सात हायस्पीड रेल्वे कॉरिडॉर उभारणार: अर्थमंत्री निर्मला सीतारामन

SCROLL FOR NEXT