Jammu-Srinagar National Highway : महामार्ग सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न ; उमर अब्दुल्ला यांचा दावा

Omar Abdullah : जम्मू-काश्‍मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग येत्या २४ तासांत सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी (ता. २२) दिली.
Jammu-Srinagar National Highway
Jammu-Srinagar National HighwayAgrowon
Published on
Updated on

Jammu Kashmir News : श्रीनगर (वृत्तसंस्था) ः जम्मू-काश्‍मीरमधील जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग येत्या २४ तासांत सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे, अशी माहिती जम्मू-काश्‍मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी मंगळवारी (ता. २२) दिली. काश्‍मीरला उर्वरित देशाशी जोडणारा हा राष्‍ट्रीय महामार्ग रामबन येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे मागील चार दिवसांपासून बंद आहे.

‘‘या भूस्खलनात अडकलेल्यांचा जीव वाचविणे याला आम्ही प्राधान्य दिले होते, त्यांना ढिगाऱ्याखालून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. आता राष्ट्रीय महामार्ग पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही युद्धपातळीवर काम करत आहोत. या महामार्गावरून एकेरी वाहतूक तरी नक्कीच सुरू करू, असे आश्‍वासन मला अधिकाऱ्यांनी दिले आहे,’’ असे अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Jammu-Srinagar National Highway
Impact of National Highways on Rivers: महामार्ग विकास की जलसंकट? वाढत्या पुरांचा धोका!

दरम्यान, रामबन येथील मदतकार्यावर सरकारचे विशेष लक्ष असून तेथील कामाचा आढावा घेण्यासाठी सलग तीन दिवस तेथे जात आहेत, असे अब्दुल्ला यांनी सांगितले. ‘‘पहिल्या दिवशी आमचे उपमुख्यमंत्री आणि संबंधित मतदार संघाचे खासदार घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कामाचा आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः जाऊन तेथे मदत कार्याचा आढावा घेतला.

सध्या बचाव कार्य असो की, महामार्गावरील राडारोडा हटविण्याचे काम असो ते तातडीने करण्याला आमचे प्राधान्य आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

तातडीने मदत देणार
सध्या आम्ही पीडितांना तातडीने तात्पुरत्या स्वरूपात मदत उपलब्ध करून देत आहोत. त्याचप्रमाणे रेड क्रॉसच्या माध्यमातून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे अब्दुल्ला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ‘‘आम्ही नुकसान भरपाईची पाहणी करू आणि त्यानंतर एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या नियमांनुसार पीडितांना नुकसान भरपाई देऊ. दरम्यान, हा भाग आपत्तीप्रवण घोषित करावा, अशी मागणी आम्ही केंद्र सरकारकडे करणार आहोत,’’ असेही अब्दुल्ला यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com