Jalna Railway Agrowon
ॲग्रो विशेष

Khamgaon-Jalna Railway : खामगाव-जालना रेल्वे मार्गासाठी राज्याची ५० टक्के निधी देण्याची हमी

गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत या मार्गाचा घोषणापत्रात उल्लेख करून अनेकांनी मते घेतली.

Team Agrowon

Buldana Railway News : गेल्या ५० वर्षांपासून मागणी होत असलेल्या खामगाव-जालना या महत्त्वांकाक्षी रेल्वे मार्गासाठी राज्य शासन ५० टक्के निधी देणार असल्याची हमी घेतल्याने आता मार्ग होण्याची आशा पल्लवित झाली आहे.

विदर्भ- मराठवाड्याला जोडणारा हा खामगाव-जालना रेल्वे मार्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने तसेच मालवाहतूक, शेती व प्रवासी वाहतुकीसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो.

गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून प्रत्येक लोकसभेच्या निवडणुकीत या मार्गाचा घोषणापत्रात उल्लेख करून अनेकांनी मते घेतली. २००९ मध्ये प्रतापराव जाधव खासदार झाल्यानंतर या मार्गासाठी अंदाजपत्रक रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आले होते.

२०१२ मध्ये पुनर्सर्वेक्षणाची मागणी करण्यात आली. ही मागणी देखील पूर्ण झाली. २०१६-१७ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाचा समावेश करण्यात आला. त्यासाठी पुंजी निवेश कार्यक्रम करून त्यासाठी तीन हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते.

त्यानंतर तत्कालीन परिवहनमंत्री नितीन गडकरी २०१८ मध्ये रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून अंतिम सर्वे करण्यात आला.

२०२२ मध्ये रेल्वे मंत्रालय व रेल्वे बोर्ड भारत सरकार यांनी अंतरिम संरक्षणासाठी १५५ किलोमीटरसाठी ३ कोटी ८७ लाख ५० हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचे आदेश मुख्य महाप्रबंधकांना दिले होते.

या मार्गाचे हवाई सर्वेक्षण करण्यात आले. भूमी अधिग्रहणासाठी अधिक गतीने कारवाई करण्याची मागणीही जाधव यांनी केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT