Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season : ‘वसाका’साठी राज्य बँक सकारात्मक

Sugarcane Factory : वसंतदादा पाटील साखर कारखान्यासंदर्भात निर्माण झालेला पेचप्रसंग व यावर प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याने तातडीने कार्यवाही करावी.

Team Agrowon

Nashik News : कसमादे कार्यक्षेत्र असलेल्या विठेवाडी (ता. देवळा) येथील वसंतदादा पाटील साखर कारखान्यासंदर्भात निर्माण झालेला पेचप्रसंग व यावर प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याने तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती वसाका बचाव समितीचे अध्यक्ष पंडितराव निकम, निमंत्रक सुनील देवरे यांनी राज्य बँकेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व प्रशासकीय मंडळाला केली.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कारखाना व्यवस्थापन या प्रकरणी सकारात्मक असून, सूचनांची दखल घेणार आहे, असे आश्वासन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिघे यांनी दिले. राज्य बँकेने थकित कर्जाच्या वसुलीकरिता कारखान्यांची मालमत्ता जप्त करून धाराशिव साखर उद्योगाकडे भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला होता.

अत्यल्प गाळप, मनमानी कारभार, सभासद, ऊस उत्पादक, शेतकरी, कामगार व संपूर्ण कार्यक्षेत्रात कारखानाप्रकरणी गांभीर्य नसणे, ऊस उत्पादक शेतकरी, कामगारांची देणी, बँक कर्ज हप्ते थकित होणे, परस्पर पोटभाडे कराराचे झालेले प्रयत्न, कारखान्यातील मशिनरी पळविण्याचा घाट, अटी व शर्तींचे उल्लंघन, कार्यक्षेत्रात निर्माण झालेला असंतोष या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत भाडेकरार रद्द करण्याबाबत दिलेले निर्देश, धाराशिव साखर उद्योगाने गाळप हंगाम बंद ठेवण्याचे व असमर्थ असल्याचे प्रसिद्ध केलेले परिपत्रक यामुळे निर्माण झालेल्या पेचप्रसंगावर मार्ग शोधण्याची गरज व भविष्याची गरज ओळखून कारखाना सुरू होणे आवश्यक झाले आहे.

यासंदर्भात राज्य सहकारी बँकेने तातडीने उपाय शोधावा, याकरिता पंडितराव निकम, सुनील देवरे, कामगार नेते अरुण सोनवणे, सुनील जाधव आदींच्या शिष्टमंडळाने मुंबईतील मुख्यालयात प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत चर्चा करून उपाय सुचविले. प्रशासनातर्फे मुख्य डॉ. दिघे, महाव्यवस्थापक माने, वरिष्ठ प्रशासन रणखांबे उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT