Water Resources Department Award  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Resources Department : ‘मेरी’ मुख्य अभियंता कार्यालयाला ‘जलसंपदा’चा राज्य पुरस्कार जाहीर

Department Of Water Resources Award : जलसंपदा विभागात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल राज्यातील पाच अभियंत्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.

मुकूंद पिंगळे

Nashik News : जलसंपदा विभागात उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल राज्यातील पाच अभियंत्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्यातील उत्कृष्ट कार्यकारी अभियंता होण्याचा मान यंदा अहमदनगरच्या मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता (स्थापत्य) सायली पाटील यांनी प्राप्त केला.

सांघिक कामासाठी दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय पुरस्कारासाठी यंदा नाशिकच्या मध्यवर्ती संकल्पचित्र संघटनेच्या (मेरी) मुख्य अभियंता कार्यालयाची निवड करण्यात आली. प्रशस्तिपत्रक व गौरवचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अहमदनगरच्या श्रीमती पाटील यांनी केलेले काम सर्वोत्कृष्ट ठरले आहे.

राज्यातील उत्कृष्ट उपअभियंता म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील ऊर्ध्व प्रवरा धरण विभागाचे सहायक अभियंता प्रमोद माने यांची निवड झाली. कनिष्ठ अभियंता व शाखा अभियंता गटात जळगावच्या तापी गोदावरी जलविद्युत व उपसा सिंचन योजनेचे शाखा अभियंता विजय पाटील यांना पुरस्कार मिळाला आहे.

जलसंपदा विभागाचे सचिव डॉ. संजय बेलसरे यांनी सांगितले, की जलसंपदातील अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीची उत्तम अंमलबजावणी करावी. वैयक्तिक कौशल्य व गुणवत्ता पणाला लावत प्रकल्प पूर्ण करावेत.

त्यातून जास्तीत जास्त जमीन सिंचनाखाली आणावी, अशी अपेक्षा शासनाची असते. त्यासाठी प्रोत्साहन म्हणून पुरस्कार देण्याची पद्धत सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत एका विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT