Paddy Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Procurement : सिंधुदुर्गात ४३ केंद्रांवर भात खरेदीसाठी नोंदणी सुरू

Paddy Registration : यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ केंद्रांवर भात खरेदी करण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी (ता. १०) जिल्ह्यातील मडुरा (ता. सावंतवाडी) सहकारी सोसायटीच्या माध्यमातून भात खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.

Team Agrowon

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात खरेदीस प्रारंभ झाला असून सावंतवाडी तालुका खरेदी-विक्री संघाच्या मडुरा सहकारी सोसायटीत खरेदीचा प्रारंभ झाला आहे. भात खरेदीकरिता जिल्ह्यात ४३ केंद्रे मंजूर असून या केंद्रांवर नोंदणीदेखील सुरू आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात यावर्षी ६२ हजार हेक्टरवर भातपीक लागवड करण्यात आली होती. या वर्षीची भातपीक कापणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता भातखरेदीला कधी सुरुवात होणार याबद्दल उत्कंठा होती. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केली आहे,

अशा शेतकऱ्यांची नोंदणी तालुका खरेदी-विक्री संघाकडे सुरू आहे. यावर्षी जिल्ह्यात ४३ केंद्रांवर भात खरेदी करण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी (ता. १०) जिल्ह्यातील मडुरा (ता. सावंतवाडी) सहकारी सोसायटीच्या माध्यमातून भात खरेदीचा प्रारंभ करण्यात आला.

तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे, सोसायटीचे अध्यक्ष ज्ञानेश परब, गुरूनाथ पेडणेकर, अभिमन्यू लोंढे, आत्माराम गावडे, मधुकर देसाई, उदय चिंदरकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात गेल्या वर्षी १ लाख ७०० क्विंटल भात खरेदी झाली होती. यावर्षी पावसाची अनियमितता आणि भातपीक कापणी दरम्यान झालेले नुकसान यामुळे उत्पादनात काहीअंशी घट झाली आहे. त्यामुळे भात खरेदीबाबत सांशकता आहे. यावर्षी शासनाने भाताला २ हजार १८३ रुपये दर निश्चित केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT