Soybean  Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Productivity : उमरगा तालुक्यात सोयाबीनचा उतारा घटला

Kharif Season : उमरगा तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने खरीप हंगामातील पिकाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांची भिस्त असते

Team Agrowon

Latest Agriculture News : निसर्गाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या यंदाच्या खरीप हंगामातील पिकाच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मूग, उडदाच्या मर्यादित उत्पन्नानंतर आता सुरू असलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नात झालेली घट आणि त्यात पुन्हा घसरलेला दर शेतकऱ्यांच्या जिव्हारी लागला आहे.

उमरगा तालुक्यात कोरडवाहू क्षेत्र अधिक असल्याने खरीप हंगामातील पिकाच्या उत्पन्नावर शेतकऱ्यांची भिस्त असते. मात्र यंदा उशीरा पाऊस सुरू झाल्याने पेरण्याही उशीरा झाल्या. परिणामी पेरणीनंतर काही दिवस पिके चांगल्या स्थितीत होती.

पावसाने पुन्हा दडी मारल्याने पिके सुकू लागली. अधून - मधून झालेल्या हलक्या पावसामुळे पिकाच्या वाढीला थोडा आधार मिळाला होता, परंतु वेळ निघून गेल्याने फलधारणा, फळधारणा व्यवस्थित होऊ शकली नाही.

यंदा पाऊस लांबल्याने ६४ हजार ६८५ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली होती. तालुक्यात सर्वदूर पाऊस नसल्याने सोयाबीन पिकाची स्थिती वेगवेगळ्या ठिकाणी सारखी नाही. शेतकऱ्यांनी महागडे बियाणे, खतांसाठी आर्थिक पदरमोड केली.

सध्या आगोटी पेरणी क्षेत्रातील सोयाबिनच्या राशी सुरू आहेत. उत्पन्न बऱ्यापैकी निघत असले तरी अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.

यंदाच्या खरीप हंगामातील पिकाने दिलासा मिळाला नाही. पेरणीसाठी वेळेत पाऊस झाला नाही. आगोटी पेरणी झालेली होती. मात्र पिकाच्या ऐन बहरात पाऊस गायब झाल्याने उत्पन्नात घट झाली आहे. सोयाबीनच्या उत्पन्नावर बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण चालते, मात्र उतारा कमी, त्यात दरात सुरु असलेली घसरण यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो आहे.
- शरणाप्पा माळी, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT