Soybean Market Agrowon
ॲग्रो विशेष

Soybean Market : हमीभावाने खरेदीला वेग, तरी सोयाबीनचे भाव स्थिरच

Soybean Rate : हमीभाव केंद्रावरील खरेदीला वेग आला असतानाच अडत बाजारातील सोयाबीनचे भाव स्थिरच असल्याचे चित्र आहे.

Team Agrowon

Latur News : हमीभाव केंद्रावरील खरेदीला वेग आला असतानाच अडत बाजारातील सोयाबीनचे भाव स्थिरच असल्याचे चित्र आहे. हमीभाव केंद्रावरील ओलाव्याचा निकष १२ वरून १५ झाल्यानंतर बाजारातील भाव वाढण्याची आशा शेतकऱ्यांना असल्याने बाजारात सोयाबीनची आवक कमी झाली आहे.

बुधवारी (ता. २७) अडत बाजारात २० हजार ८८३ क्विंटल सोयाबीनची आवक होऊन कमाल भाव चार हजार ३६३ तर किमान भाव चार हजार शंभर होता. भावातील चढउतार सुरु असली तरी शेतकऱ्यांच्या भाववाढीच्या आशा कायम आहेत. गेल्या काही दिवसातील अनुभव पहाता सोयाबीनची आवक वाढली की त्याचे भाव कमी होत आहेत. आता आवक कमी झाली की भावात थोडी वाढ झाली.

गेल्या काही दिवसात सोयाबीनमधील ओलावा कडक उन्हामुळे कमी होऊन हमीभाव केंद्रावर सोयाबीनच्या खरेदीला वेग येताच बाजारातील आवक कमी झाली आहे. आवक कमी होताच भाव थोडे वाढले. यामुळे काही दिवसात आवक व भाव स्थिर असल्याचे चित्र आहे.

केंद्र सरकारने १५ टक्के ओलावा असला तरी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी अजून केंद्रावर सुरू झालेली नाही. दुसरीकडे हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी हेक्टरची उत्पादनाची मर्यादाही वाढवावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून सुरू आहे.

सोयाबीन विक्रीच्या नोंदणीची मुदत १५ डिसेंबरपर्यंत वाढल्यामुळे शेतकरी सोयाबीनच्या भाववाढीसाठी वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत. तर काही शेतकरी तातडीच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी बाजारात मिळेल त्या भावाने सोयाबीनची विक्री करताना दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे सोयाबीनच्या साठवणुकीची व्यवस्था नाही.

मागील काही हंगामात सोयाबीन साठवूनही त्याला अपेक्षित भाव मिळाला नाही. यामुळे सोयाबीनच्या भाववाढीची जास्त दिवस वाट न पहाता सोयाबीनची विक्री करून त्याचा विषय संपवून दुसऱ्या कामाला लागण्याची मानसकिताही काही शेतकऱ्यांत दिसून येत आहे.

दुसरीकडे उडीदाच्या बाजारभावात वाढ होताच शेतकऱ्यांनी साठवणुकीतील उडीद विक्रीसाठी काढले आहे. हंगामाच्या सुरुवातीला उडीदाला साडेसात हजार क्विंटल भाव होता. यामुळे भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी उडीद घरी थप्पी लावून ठेवत सोयाबीनच्या विक्री केली. आता उडीदाचे भाव सात हजार आठशे रुपयांवर गेले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT