Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : सोयाबीन-कापूसप्रश्नी शुक्रवारी ‘रेल्वे रोको’ आंदोलन : तुपकर

Farmer Demand : आमचा संयम संपला असून शुक्रवारी (ता. १९) ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्यात येईल,’’ असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

Team Agrowon

Buldhana News : ‘‘मागील काही महिन्यांपासून आपण शेतकऱ्यांसह रस्त्यावर लढत आहोत. मात्र निवडणूक अभियान राबविणारे मुख्यमंत्री असो वा अन्य सत्ताधारी नेते असो, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सवड नाही. यामुळे आमचा संयम संपला असून शुक्रवारी (ता. १९) ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्यात येईल,’’ असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

जिल्ह्यात मिसाळवाडी येथे शनिवारी (ता.१३) रात्री शेतकरी, कष्टकरी, मजूर व तरुणांचा परिवर्तन एल्गार मेळावा झाला. या वेळी गावकऱ्यांनी तुपकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी १ लाख रुपये लोकवर्गणीचा धनादेश दिला. या वेळी तुपकर यांनी नवीन आंदोलनाची घोषणा केली.

तुपकर म्हणाले, ‘‘झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी शुक्रवारी जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावरून मुंबई, दिल्ली व गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या अडवून शेतकऱ्यांची ताकद सरकारला दाखवणार आहोत. मागील ऑक्टोबरपासून सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांसाठी विविध टप्प्यात आंदोलने करीत आहे.

एल्गार मोर्चा, रथयात्रा, मंत्रालय ताब्यात घेणे, अन्नत्याग, नागपूर अधिवेशनावरील हल्लाबोल आदींद्वारे शासनाकडे मागण्या रेटल्या. सोयाबीन-कापसाला दरवाढ, येलो मोझॅक, बोंडअळीची, दुष्काळाची नुकसान भरपाई संदर्भात सरकारने आश्वासने दिली पण कारवाई मात्र शून्य आहे.’’

‘मुख्यमंत्री सत्तेच्या धुंदीत मशगूल

‘‘सत्तेच्या धुंदीत मशगूल असणारे मुख्यमंत्री राज्यभर पक्षाचे दौरे करीत आहेत. पण सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी दिल्ली दरबारी जायला त्यांना वेळ नाही. नुसतीच नुकसान भरपाईची घोषणा केली. पण एक रुपया नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. त्यामुळे आता शेतकऱ्यांचा संयम सुटत चाललेला आहे. सरकारला १८ जानेवारीची मुदत दिली आहे. मदत मिळाली नाही तर १९ जानेवारीला आंदोलन करू,’’ असा इशारा तुपकर यांनी दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget 2026: कृषी शिक्षण, संशोधनावरील तरतूद वर्षागणिक तोकडीच

Bharat-VISTAAR AI: अर्थसंकल्पातून 'भारत विस्तार एआय'ची घोषणा, याचा शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Sandlwood Cultivation : चंदन लागवडीसाठी अर्थसंकल्पात तरतूद; पाच राज्यांमध्ये चंदनाची सर्वाधिक लागवड

Groundwater Management: सर्व विभागाच्या समन्वयातून भूजल व्यवस्थापनाची गरज

Union Budget 2026: कृषी, ग्रामीण उद्योगासह शेतकरी हिताचा संकल्प

SCROLL FOR NEXT