Soyabean Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Soyabean Rate : अमरावती बाजार समितीत सोयाबीन ४७४० रुपयांवर

Soyabean Market Rate : बाजार समितीमध्ये सोयाबीनची २१३४ पोत्यांची आवक झाली व ४६५० ते ४७४० रुपये भाव मिळाला आहे.

Team Agrowon

Amravati News : अमरावतीच्या बाजारात नव्या सोयाबीनची आवक सुरू होताच बाजारात तब्बल ५०० रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. मुळकूज, यलो मोझॅकसह हंगामात कीड, रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने सोयाबीनची उत्पादकता प्रभावित झाली आहे. त्यानंतरही दर दबावात असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीला मृग नक्षत्रात ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. त्यांच्याकडील सोयाबीन आता बाजार समितीमध्ये विक्रीला येत आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक वाढताच दरात तब्बल ५०० रुपयांनी घट झाली आहे. शनिवारी (ता. २३) बाजार समितीमध्ये सोयाबीनची २१३४ पोत्यांची आवक झाली व ४६५० ते ४७४० रुपये भाव मिळाला आहे. महिनाभरापूर्वी सोयाबीनने पाच हजार रुपयांचा पल्ला गाठला होता. यंदा मॉन्सून एक महिना विलंबाने आला. परिणामी पेरण्यांनाही उशीर झाला. त्याचाही फटका उत्पादकतेला बसणार अशी शक्‍यता तज्ज्ञांनी आधीच वर्तविली होती. त्यानंतर जुलै महिन्यापासून मात्र पावसाने दाणादाण उडवून दिली. त्याच्या परिणामी अनेक शिवारात पाणी साचून राहिल्याने मुळकूजसह इतर अनेक कीड, रोगांचा प्रादुर्भाव शिवारात दिसून आला. अतिवृष्टीमुळे सोयाबीन बाधित झाल्याने वाढ खुंटली. परिणामी सोयाबीनच्या सरासरी उत्पादकतेत यंदा घट आली आहे.

असे आहे दर (प्रती क्‍विंटल रुपयांमध्ये)

९ सप्टेंबर ः ४७०० ते ४८७१

२० सप्टेंबर ः ४८०० ते ४९६०

२३ सप्टेंबर ः ४६५० ते ४७४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 20th Installment : पीएम किसानचा २० वा हप्ता ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात?

Sangli Water Storage : शिराळा तालुक्यातील ४७ तलाव पूर्ण क्षमतेने भरले

Maharashtra Politics: मराठवाड्यात काँग्रेसला धक्का; सुरेश वरपूडकर भाजपवासी तर कैलास गोरंट्याल यांचा प्रवेश गुरुवारी

Sangli Rain : वारणा धरण क्षेत्रात संततधार

Kolhapur Rain : नद्यांचे पाणीपात्राबाहेर; कोल्हापुरात पावसाची उघडझाप

SCROLL FOR NEXT