Wheat Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Wheat Sowing : थंडीमुळे गव्हाची पेरणी वेगात

Rabi Sowing : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापामानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे.

Team Agrowon

Pune News : सध्या राज्यात चांगलीच थंडी वाढल्याने किमान तापामानाचा पारा काही प्रमाणात घटलेला आहे. यामुळे गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गव्हाच्या पेरण्यांना चांगलाच वेग आला.

आतापर्यंत विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी २८ हजार ६२७ म्हणजेच १७ टक्के पेरणी झाली असून पिके जोमात असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा जास्त झालेल्या पावसामुळे गव्हाच्या पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यातच गव्हाच्या पेरणीस नोव्हेबर ते डिसेबर हा कालावधी चांगला असतो. मात्र, दिवाळीनंतर काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने पेरण्या करण्यास सुरुवात केली.

सध्या अनेक ठिकाणी गहू पिके उगवून आली असून वाढीच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील उत्तरेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ ही तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखली जात असून विभागात नगरमधील राहुरी तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातही चांगल्या पेरण्या झाल्या असून आतापर्यंत सर्वाधिक गव्हाचे पेरणी राहुरीमध्ये सुमारे ४ हजार ८१३ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्याखालोखाल पाथर्डी, पारनेर, संगमनेर, कोपरगाव, कर्जत या तालुक्यांतही चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. तर नगर, राहाता, श्रीरामपूर, अकोले, नेवासा, शेवगाव या तालुक्यांत काहीशा कमी पेरण्या झाल्या आहेत.

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे सुमारे ७९५ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ बारामती, दौंड, इंदापूर या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहेत. हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, पुरंदर तालुक्यांत पेरण्या कमी झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यातही उत्तर सोलापूरमध्ये सुमारे २ हजार ५४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

त्यानंतर करमाळा तालुक्यात काही प्रमाणात पेरण्या झाल्या असून दक्षिण सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांतही पेरण्यांनी वेग घेतला आहे.

विभागात झालेली गव्हाची पेरणी, हेक्टरमध्ये

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्केवारी

नगर --- ८६,४०५ -- १९,२१३ ---२२

पुणे --- ३९,८०३ --- ३०२१-- ८

सोलापूर --- ४२५८८ --- ६३९४ -- १५

एकूण -- १,६८,७९६ -- २८,६२७ -- १७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT