Bajara  Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Bajara Sowing : पुणे जिल्ह्यात उन्हाळ बाजरीची चार हजार हेक्टरवर पेरणी

Bajara Production : उन्हाळ हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळ बाजरी पिकाकडे अधिक कल असल्याचे दिसून येते.

Team Agrowon

Pune Agriculture News : उन्हाळ हंगामात रोग, किडीचा प्रादुर्भाव होत नसल्याने पुणे जिल्ह्यातील शेतकरी बाजरीकडे वळत आहेत. यंदाही शेतकऱ्यांचा उन्हाळ बाजरी पिकाकडे अधिक कल असल्याचे दिसून येते.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार हजार १२९ हेक्टरवर पेरणी केली आहे. यामध्ये खेड तालुका अव्वल असून पेरणीच्या क्षेत्रात आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

जिल्ह्यात बाजरीचे सरासरी क्षेत्र चार हजार २३३ हेक्टर आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चार हजारांहून अधिक हेक्टरवर पेरणी केली होती. यंदाही जवळपास तेवढ्याच क्षेत्रावर पेरणी होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोग, किडीचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकावर होतो. त्याचा परिणाम होऊन उत्पादनात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याऐवजी उन्हाळ्यात बाजरी पीक घेण्यावर भर दिला आहे.

पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळ्यात रोग, किडीचा कमी प्रादुर्भाव आणि चांगले उत्पादन मिळत असल्याचा अनुभव शेतकऱ्यांचा आहे. याशिवाय चांगल्या दर्जाचा चाराही उन्हाळ्यात उपलब्ध होतो. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, खेड, शिरूर, जुन्नर तालुक्यांतील शेतकरी मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी करत आहेत.

यंदा खेड तालुक्यात सर्वाधिक लागवड बाजरीची झाली आहे. खेडमधील वाफगाव, कळूस, दावडी, गुंडाळवाडी, बुरसेवाडी, सोयगाव, वेताळे अशा अनेक गावांत मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली आहे.

जुन्नरमध्येही नारायणगाव, खोडद, बोरी, बेल्हे, हिवरेतर्फे, आळेफाटा, मांजरवाडी, वारूळवाडी, ओतूर, रोकडी, उब्रज, डिंगोरे, आर्वी, कुरण, कांदळी, निमगाव चावा अशा बहुतांशी गावांत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे. आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर, नागापूर, अवसरी, धामणी, कळंब, मंचर, पेठ अशा अनेक गावात मोठ्या प्रमाणात बाजरीची पेरणी झाली.

तालुकानिहाय उन्हाळ बाजरी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका --- सरासरी क्षेत्र -- पेरणी

खेड -- ११३४ -- १६०६

जुन्नर -- २०६० -- १२४०

आंबेगाव -- ६९७ -- ६९०

मावळ -- १७६ -- १८४

शिरूर -- ५९ -- ७६

बारामती -- ४ -- ५४

इंदापूर -- ० -- १६६

दौंड -- ०-- ७३

पुरंदर -- १ -- १७

हवेली -- ६२ --- २०

मुळशी -- २२ --- ४

पावसाळ्यात जास्त पावसामुळे रोग, किडींचा प्रादुर्भाव होऊन उत्पादनात घट येते. उन्हाळ हंगामात रोग, किडींचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी उन्हाळ हंगामातील बाजरीची पेरणी करतात. यंदा खेड, जुन्नर तालुक्यांत मोठ्या प्रमाणात पेरणी झाली आहे.
संजय काचोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Price Issue: कापसाचे दर पडण्यास शासन जबाबदार

Banana Price: गुणवत्ता निकषावर मालाला मिळणार दर

Agriculture Technology: नव्या तंत्रज्ञानामुळे देशात कृषी क्षेत्रात क्रांती

Global Sugar Production: जागतिक बाजारात साखर पुरवठा वाढणार

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

SCROLL FOR NEXT