Rabi Season Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : बाजरी, कंदा लागवड घटणार; मका, तेलबिया पिकांकडे कल

Rabi Sowing : खानदेशात यंदा रब्बीत पेरण्यांची गती चांगली राहणार आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरण्या सुरू होतील, असे संकेत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा रब्बीत पेरण्यांची गती चांगली राहणार आहे. या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पेरण्या सुरू होतील, असे संकेत आहेत. कोरडवाहू हरभरा, दादर ज्वारीसह अन्य पिकांची पेरणी वेळेत किंवा मुदतीत होणार असल्याने कांदा व बाजरी पेरणी कमी होण्याचे संकेत आहेत.

मागील हंगामात किंवा मागील वर्षी पावसाचा मोठा खंड होता. कुठल्याही महिन्यात वेळेत पाऊस नव्हता. यामुळे अनेक शेतकरी रब्बी पिकांची लागवड मुदतीत करू शकले नाहीत. पेरण्या लांबल्याने पुढे कमी कालावधी व कमी पावसात कुठले पीक घ्यावे, असा संभ्रम मागील वेळेस होता. यातून बाजरीची पेरणी खानदेशात अनेकांनी केली होती. परंतु यंदा पाऊस वेळेत आला आहे.

रब्बीची पेरणी १०० टक्क्यांवर होईल, असे दिसत आहे. पेरण्यांना गती लवकरच येणार आहे. केळीलागवड सुरू आहे. ही लागवड अनेक भागांत आटोपत आली आहे. तसेच मका, सूर्यफूल यांची पेरणीही सुरू होत आहे.

मका व तेलबिया पिकांकडे शेतकऱ्यांचा अधिक कल आहे. यामुळे बाजरी पेरणीची मोठी निकड किंवा या पर्यायाची निवड शेतकरी यंदा करणार नाहीत, अशीही स्थिती आहे. तसेच कांदा लागवडही कमी होईल. ही लागवड फक्त यावल, चाळीसगाव, चोपडा, धुळ्यातील धुळे, साक्री भागात होईल.

मागील हंगामात बाजरीची पेरणी खानदेशात सुमारे १५ हजार हेक्टरवर झाली होती. यंदा सात ते आठ हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. पेरणी डिसेंबरमध्ये तसेच काही शेतकरी नोव्हेंबरमध्येही करतील. बाजरी पेरणीसंबंधीचे क्षेत्र पेरणीसाठी अजून तयार नाही. अनेक जण कापूस पीक काढून त्यात बाजरी पीक घेतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Financial Crisis: दुष्काळात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी

Onion Storage Loss: साठवणुकीत ३७ टक्के कांद्याचे नुकसान

MLA Pension Rule: आमदारांच्या निवृत्ती वेतनाला आव्हान; उच्च न्यायालयाची प्रकरणावर सुनावणीस मान्यता

Urea Subsidy Formula: युरिया अनुदानाचे सूत्र बदलण्याची शिफारस

October Heat: ‘ऑक्टोबर हीट’ ठरतेय तापदायक

SCROLL FOR NEXT