Agriculture Center  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Sowing : सात लाख हेक्टरवर पेरणी शक्य

Sowing Update : नगर जिल्ह्यात यंदा खरिपात साधारण ७ लाख २ हजार हेक्टरवर खरिपात पेरणीचा कृषी विभागाचा अंदाज आहे.

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात यंदा खरिपात साधारण ७ लाख २ हजार हेक्टरवर खरिपात पेरणीचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यात सर्वाधिक सोयाबीन, कापसाचे क्षेत्र राहण्याची शक्यता गृहीत धरली आहे. अनुषंगाने बियाणे, खतांसह अन्य निविष्ठाचे नियोजन केले जात आहे.

नगर जिल्ह्यात खरिपात यंदा ५ लाख १ हजार ४७४ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यात खरिपात ५ लाख ८६ हजार ३५८ हेक्टरवर पेरणी झाली होती. गेल्या तीन वर्षांत खरिपात झालेली पेरणी, कापूस लागवडीच्या अनुषंगाने यंदा खरीप पेरणी होईल असे गृहीत धरुन खरिपासाठी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. नगर जिल्ह्यात खरिपात प्रमुख पीक असलेल्या बाजरीच्या क्षेत्रात वरचेवर घट होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ८३ हजार हेक्टरवर बाजरी पेरली होती. यंदा त्यात १७ हजार हेक्टरची अधिक भर पडेल असा अंदाज आहे.

कापसाची गेल्या वर्षी १ लाख ५३ हजार ३४१ हेक्टरवर लागवड झाली होती. यंदा त्यात काही प्रमाणात भर पडेल. सोयाबीनची गतवर्षी १ लाख ८८ हजार ८५९ हेक्टरवर पेरणी झाली, यंदा चार ते पाच हजार हेक्टरची भर पडेल तसेच यंदा दरवर्षीच्या तुलनेत लवकरच चांगल्या पावसाची शक्यता व्यक्त झाली असल्याने मूग, उडीद आणि तुरीचे क्षेत्रही गतवर्षीपेक्षा वाढेल असा अंदाज बांधून कृषी विभाग नियोजन करत आहे असे जिल्हा मोहीम अधिकारी अमृत गांगडे, यांनी सांगितले. नगर जिल्ह्यातील पारनेर, नगर, श्रीगोंदा, जामखेड, शेवगाव, कर्जत भागांत दोन दिवसांपासून पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांत खते, बियाणे आणि अन्य निविष्ठा खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे.

खरिपातील प्रस्तावित क्षेत्र (हेक्टर)

भात १८ हजार

बाजरी १ लाख

मका ८७ हजार

तूर ६३ हजार

मूग ३५ हजार

उडीद ५५ हजार

सोयाबीन १ लाख ९० हजार

कापूस १ लाख ५४ हजार

ठरावीक वाणाचा आग्रह नको : सुधाकर बोराळे

खरीप पेरणी, कापूस लागवडीबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले, की चांगला पाऊस झाल्याशिवाय खरीप पेरणी, कापूस लागवड करुन नये. खरिपात ठरावीक वाणाच्या बियाण्यांची शेतकरी मागणी करतात. त्याचा फायदा घेऊन काही लोक अधिक दराने संबंधित बियाण्यांची विक्री करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. त्यामुळे ठरावीक वाणांचा आग्रह धरू नये, असे आवाहन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT