Kharif Sowing
Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

खरीप हंगामात १४ लाख हेक्टरवर पेरणीचा अंदाज

टीम ॲग्रोवन

पुणे ः राज्यातील अनेक भागात पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. सध्या पुणे महसूल विभागात पूर्व मशागतीच्या काही ठिकाणी सुरूवात झाली आहे. पश्चिम पट्यातील तालुक्यात भात रोपवाटिकेच्या कामांना सुरूवात झाली आहे. यंदा वेळेवर पाऊस झाल्यास १३ लाख ८९ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यानुसार कृषी विभागाने खते, बियाण्यांचे नियोजन करण्यास सुरूवात केली आहे.

सध्या विभागातील बहुतांशी भागात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. ज्या शेतकऱ्यांनी उन्हाळी हंगामातील पिके घेतलेली नाहीत, अशा शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी पूर्व मशागतीवर शेतकरी भर देऊ लागले आहेत. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात प्रामुख्याने भात पिकांची लागवड केली जाते. तर सोलापूर व सातारा, पुणे, सांगलीच्या पूर्व भागात सोयाबीन, तूर, मूग, उडीद अशी पिके शेतकरी घेतात.

पुणे विभागातील पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात खरिपाचे सरासरी १३ लाख ८९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. प्रत्यक्षात १३ लाख ४० हजार हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. निविष्ठा पुरवठ्याचे नियोजन कृषी विभागामार्फत सुरू झाले आहे. पश्चिम पट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत आहे. त्यामुळे यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहील. त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणाऱ्या रोपवाटिकांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन भात रोपवाटिकेची कामे सुरू करावीत. काही ठिकाणी भात बियाण्यांची तजवीज करण्यास सुरूवात झाली आहे.

खरिपात पेरणी होणारे अंदाजित क्षेत्र (हेक्टर)

घटक...अंदाजित पेरणी (लाख हेक्टर)

खरीप तृणधान्ये...६.४५

खरीप कडधान्ये...३.०२

खरीप गळीत धान्ये...४.४२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांदा पुन्हा गडगडला

Lok Sabha Election 2024 : बारामतीकरांचा कौल मतपेटीत बंद

LokSabha Election : मावळात मशाल पेटणार की धनुष्यबाण चालणार?

Loksabha Election 2024 : अकरा मतदार संघांतील उमेदवारांचे भवितव्य ‘बंद’

PDKV Seed Research Centre : ‘पंदेकृवि’चे बियाणे संशोधन केंद्र ठरले राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट

SCROLL FOR NEXT