Kharif Season Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Advice : पाऊस ७५ मिलिमीटर पडल्यावरच करा पेरणी

Agriculture Update : शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता ७५ मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : मृग नक्षत्राला सुरुवात होऊन आठवडे उलटले. जिल्ह्यात मोजक्या ठिकाणचा अपवादवगळता अद्याप चांगला पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई न करता ७५ मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, असे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.

यंदा वेळेवर मॉन्सूनचे आगमन होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना आस लागली होती. अनेक शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाने धूळपेरणी केली. मात्र, अजूनही पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झालेला नाही. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यानंतर पावसाने दांडी मारली आहे. परिणामी, धूळपेरणी संकटात आली आहे.

दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणासोबत उकाडा वाढला आहे. हा काळ पेरणी योग्य नसल्याचे कृषी विज्ञान केंद्रांचे म्हणणे आहे. मॉन्सून दाखल झाला असला तरी अजून सक्रिय मॉन्सून जिल्ह्यात झालेला नाही. काही भागात पाऊस होत आहे. काही भाग कोरडाच आहे. सर्वदूर पाऊस होण्यासाठी सक्रिय मॉन्सूनची गरज आहे.

जोपर्यंत ७५ मिमीपेक्षा जास्त पाऊस होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे मत तज्ज्ञांचे आहे. जिल्ह्यात सर्वदूर पावसासाठी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनीही पेरणीसाठी सध्या ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ ची भूमिका घेतली आहे. जून महिन्यात मूग, उडीद पेरणी होणे अपेक्षित असते. जूनचा तिसरा आठवडा सुरू असला तरी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

जिल्ह्यात काही भागात पाऊस झाला आहे. काही भागात हलका पाऊस होत आहे. मॉन्सूनचा पाऊस असला तरी सर्वदूर पाऊस झालेला नाही. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. ७५ मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी चांगले राहील.
डॉ. प्रमोद यादगिरवार, सहयोगी संशोधन संचालक (मध्य विदर्भ), कृषी विज्ञान केंद्र, यवतमाळ.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT