Jowar Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Crop : चिखलदरातील शेतकऱ्यांना ज्वारी पिकाचा आधार

Jowar Crop improvement : चिखलदरा तालुक्यातील तिन्ही मंडलांतील शेतकऱ्यांनी ज्वारीच्या उन्हाळी सुधारित वाणाची पेरणी केली.

Team Agrowon

Amravati News : चिखलदरा तालुक्यातील तिन्ही मंडलांतील शेतकऱ्यांनी ज्वारीच्या उन्हाळी सुधारित वाणाची पेरणी केली. शेतात डोलत असलेले हिरवेगार ज्वारीचे मोत्यासारखे कणीस या भागातील शेतकऱ्यांना जगण्याचे एकप्रकारे बळ देत आहे. यंदा १३५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे.

गत काही वर्षांत विविध कारणांमुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या ज्वारी पिकाकडे पाठ फिरवली होती. मात्र आता पुन्हा खरिपाऐवजी रब्बी, उन्हाळी हंगामात ज्वारी लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. यंदा चिखलदरा तालुक्यातील तीन मंडलांत १३५ हेक्टरवर ज्वारीची लागवड झाली आहे.

सध्या गव्हापेक्षा ज्वारी खाण्याकडे शहरी नागरिकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच गव्हाच्या तुलनेत ज्वारी भाव खात आहे. तसेच पशुधन पालन करणाऱ्या शेतकऱ्यांना उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई भेडसावत आहे. चाऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट झालेला आहे. या ज्वारीच्या पिकापासून जनावरांनादेखील चारा मिळत आहे.

अंबापाटी, गिरगुटी, मलकापूर, टेम्ब्रूसोंडा या परिसरात यंदा ज्वारीची लागवड आहे. या भागात बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी उन्हाळी ज्वारीचे पीक घेतले आहे. कडब्याची कुट्टी मिळणार आहे. विशेष म्हणजे, बहारदार व हिरवेगार उभे असलेले ज्वारीचे पीक येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत आहे.

पूर्वी ज्वारीचे क्षेत्र अधिक राहत असल्याने चाराटंचाई भेडसावत नव्हती. आता पुन्हा धान्याच्या उद्देशाने शेतकरी ज्वारीकडे वळू लागले. त्यामुळे तालुक्यात यंदा रब्बीत सुमारे १३५ हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. त्यामुळे चाराटंचाईतून काहीसा दिलासा मिळेल.
लहूदास आळे, कृषी अधिकारी, चिखलदरा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT