Jowar  Agrowon
ॲग्रो विशेष

Sorghum Crop : कोल्हापूर जिल्ह्यात ज्वारी पीक समाधानकारक

Jowar Production : ज्वारी पीक यंदा जिल्ह्यात जोमात आल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

Team Agrowon

Kolhapur News : ज्वारी पीक यंदा जिल्ह्यात जोमात आल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे. काळम्मावाडी धरणाची गळती काढण्यासाठी धरणात अपुरा साठा ठेवला जाणार असल्याने पाटबंधारे विभागाने केलेल्या आवाहनानुसार अनेक शेतकऱ्यांनी ऊस लावणीला फाटा देऊन ज्वारीचे उत्पादन घेतले.

ज्वारीचे दर वाढल्याने यंदा शेतकऱ्यांना फायदा झाला. ज्वारीच्या कडब्याचा जनावरांसाठी खाद्य म्हणून उपयोग होतो. त्यामुळे कडब्याच्या पेंडीचा दर २५ ते ३० रुपये झाला. सध्या ज्वारीचे उत्पादन सरासरी एकरी सात ते दहा क्विंटल आहे, तर जिराईत शेतीत पाच ते सहा क्विंटल आहे. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणाऱ्या ज्वारीच्या वाणाची निवड केली आहे. यामध्ये अपर्णा, सुवर्णा, मालदांडी यांसह सुधारित जातींचा समावेश आहे.

जिल्ह्यात यावर्षी रब्बीचे क्षेत्र ११ हजार ८५४ हेक्टर आहे. यावर्षी जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २१ हजार ७०० हेक्टर असून, यामध्ये ११ हजार ८५४ हेक्टर ज्वारी, गहू १६५९ हेक्टर, मका १२९३ हेक्टर, इतर तृणधान्ये १५० हेक्टर, हरभरा ४७७३ हेक्टर, इतर कडधान्ये ११३६ हेक्टर, तीळ ३९ हेक्टर व गळीत धान्य १०३ हेक्टर या पिकांचा समावेश आहे.

सध्या ज्वारीची ६० टक्के काढणी पूर्ण झाली आहे. गहू, हरभरा काढणी अंतिम टप्प्यात आहे. जवळपास रब्बी हंगामातील ६० ते ७० टक्के पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. रब्बी हंगामापाठोपाठ उन्हाळी हंगामातही आतापर्यंत उन्हाळी भाताची १६० हेक्टर, मका पिकाची ७९५ हेक्टर व उन्हाळी भुईमूग ६९२ हेक्टरवर पेरणी झाली असून उगवण समाधानकारक आहे.

पाटबंधारे विभागाने ऊस लावण न करण्याबाबत आवाहन केल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी यावर्षी हमखास उत्पादन मिळवून देणारे ज्वारीचे पीक निवडले आहे. भात कापणीनंतर ज्या शेतकऱ्यांनी लगेच ज्वारी पीक घेतले, त्यांनी पीक पोटरीला आल्यानंतर सरासरी १२०० रुपये प्रतिगुंठा कडबा विकून त्याच क्षेत्रात ऊस पीक घेऊन दुहेरी उत्पन्नाचा फायदा घेतला आहे. एकंदरीत उसापेक्षा हमखास पैसे मिळवून देणाऱ्या ज्वारी पिकाची निवड फायद्याची ठरली आहे.
सुनील डवरी, कृषी पर्यवेक्षक, कृषी विभाग, भुदरगड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Rainfall: पुणे जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला

MKCL Investment: ‘एमकेसीएल’ने सरकारमध्ये गुंतवणूक करावी; शरद पवार यांची अपेक्षा

Market License Cancellation: पणन संचालकांचा खासगी बाजारांवर कारवाईचा धडाका; ‘रामेश्वर, ‘कसमादे’, ‘जय गजानन’ बाजारांचे परवाने रद्द

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

SCROLL FOR NEXT