Solar  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar System : वीज देयक बचतीसाठी पालिकेच्या शाळांवर सोलार पॅनेल

Mira Bhayandar Muncipal Corporation : वीज वापराच्या खर्चावरील बचतीसाठी आणखी पुढचे पाऊल टाकत मिरा-भाईंदर महापालिकेने आपल्या सर्व शाळा, त्याचप्रमाणे मिरा रोड येथील रुग्णालयावर सौर ऊर्जा पॉवरग्रीड यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Mumbai News : वीज वापराच्या खर्चावरील बचतीसाठी आणखी पुढचे पाऊल टाकत मिरा-भाईंदर महापालिकेने आपल्या सर्व शाळा, त्याचप्रमाणे मिरा रोड येथील रुग्णालयावर सौर ऊर्जा पॉवरग्रीड यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी शहरातील सर्व पथदिव्यांना एलईडी दिवे बसवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यातून महापालिकेच्या वीज देयकावरील खर्चात मोठी बचत होणार आहे.

राष्ट्रीय हवा शुद्धीकरण उपक्रम अंतर्गत मिरा-भाईंदर महापालिकेला केंद्र सरकारकडून अनुदान प्राप्त झाले आहे. त्यातून शहरात विविध उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून महापालिकेच्या सर्व शाळा व मिरा रोड येथील इंदिरा गांधी रुग्णालयाच्या इमारतीवर सौर ऊर्जा पॉवरग्रीड यंत्रणा बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी सुमारे ५० लाखांचा खर्च अपेक्षित आहे.

हा खर्च राष्ट्रीय हवा शुद्धीकरण उपक्रमाच्या निधीतूनच केला जाणार आहे. महापालिकेच्या मराठी, उर्दू, हिंदी, तसेच गुजराती माध्यमांच्या ३६ शाळा सुमारे १७ इमारतीत सुरू आहेत. या शाळांमधून सध्या साडेनऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या इमारतींवर सौरऊर्जा पॉवरग्रीड यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्याच्या प्रस्तावाला आयुक्त संजय काटकर यांनी मान्यता दिली आहे.

महिन्याअखेरीस विजेचा दर निश्‍चित

सौर ऊर्जा यंत्रणेद्वारे वीजनिर्मिती होणार आहे, तेवढी सर्व ऊर्जा ग्रीडद्वारे संबंधित वीज कंपनीला देण्यात येणार आहे. या विजेची युनिटमध्ये मोजणी होणार आहे. वीज कंपनीला ही वीज किती दराने द्यायची, यासंदर्भात महापालिकेकडून वीज नियामक आयोगाकडे अपील सादर करण्यात आले आहे.

या महिन्याच्या अखेरीस त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर तेवढे पैसे महापालिकेच्या अन्य ठिकाणच्या इमारतींसाठी लागणाऱ्या विजेच्या देयकातून वजा केली जाणार आहे. याआधी महापालिकेने कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पदेखील कार्यान्वित केले आहेत. त्यातूनही वीजनिर्मिती होणार आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय हवा शुद्धीकरण उपक्रमाअंतर्गत पालिका शाळांवर सौर ऊर्जा पॉवरग्रीड बसविण्यात येणार आहे. मिरा रोड येथील पालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयाच्या इमारतीवरही ही यंत्रणा बसविण्याचे काम सुरू आहे. यातून पालिकेच्या वीज देयकावरील खर्चात मोठी बचत होणार आहे.
दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा-भाईंदर महापालिका

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

NHB Subsidy Cut: लेखाजोखा ‘एनएचबी’चा!

AI in Agriculture: कृषीतील एआय, रोबोटिक्स, ड्रोन तंत्रज्ञानाला नवी दिशा

POCRA Project Audit: ‘पोकरा’ प्रकल्पाचे पूर्ण लेखापरीक्षण करा: किशोर तिवारी

Women’s Freedom and Equality: स्त्रीला जोखडात बांधणारी विचारसरणी उखडून फेका: राहुल गांधी

Kharif Crop Growth: खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील पिके बहरली

SCROLL FOR NEXT