Solar Pump agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump : नवीन शेती पंपांना सोलर सक्तीची अट; कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Farmers in Kolhapur : राज्य शासनाने शेतीपंपांना नवीन वीज कनेक्शन घेताना सोलार सक्तीचे केले आहे. मात्र, नदीकाठावरील पंपांसाठी सोलार अशक्य असल्याने ही अट रद्द करण्यात यावी.

sandeep Shirguppe

Maharashtra Farmers : राज्य शासनाने शेतीपंपांना नवीन वीज कनेक्शन घेताना सोलार सक्तीचे केले आहे. मात्र, नदीकाठावरील पंपांसाठी सोलार अशक्य असल्याने ही अट रद्द करण्यात यावी. अशी मागणी महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनकडून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे केली.

ऑक्टोबर 2024 साली महावितरणे कृषी पंपाला फिडरद्वारे सर्व्हिस कनेक्शन देण्याचे थांबवले आहे. सोलर कनेक्शन घेण्यासाठी सक्ती केली जात आहे. शासनाने सोलर बाबतीत चांगले धोरण आणले आहे. ज्या शेतकऱ्यांना कृषीपंप कनेक्शन पाहिजे, त्यांच्यासाठी १० टक्के रक्कम ग्राहकाने भरून उर्वरित ९० टक्के शासन भरणार आहे. आणि सोलर पॅनल आणि मोटर देणार, पॅनल बसाविण्याची जागा ग्राहकाने उपलब्ध करून देण्याची आहे, अशी अट आहे.

परंतु, नदी काठावर ज्यांना कनेकशन पाहिजे त्या ठिकाणी पूर येत असल्याने तिथे पॅनेल बसविणे शक्य नाही. तसेच अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. मुळात जमीन कमी असल्यामुळे त्यांना त्याठिकाणी पॅनेल बसाविणे शक्य नाही. अश्या स्थानिक अडचणीमुळे कृषी ग्राहकांची महावितरणकडून कोंडी झाली आहे. तरी, आपण सोलरची सक्ती करू नये आणि त्या ग्राहकांचे स्थळ पाहणी करून पूर्वीप्रमाणे फीडरवरुण सर्व्हिस कनेक्शन द्यावे.

अन्यथा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडेरेशन तर्फे महावितरणच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशारा देण्यात आला. यावेळी इरिगेशन फेडरेशनचे प्रमुख विक्रांत पाटील (किणीकर), राजेंद्र सूर्यवंशी, बाबासाहेब देवकर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT