Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : गाळप, साखर उत्पादनात, सोलापूर जिल्हा आघाडीवर

Sugarcane Production : यंदाच्या साखर हंगामात जिल्ह्याने गाळप व साखर उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे.

Team Agrowon

Solapur News : यंदाच्या साखर हंगामात जिल्ह्याने गाळप व साखर उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे. परंतु ऊसतोडणी यंत्रणेचा जिल्ह्यातील कारखान्यांना चांगलाच सामना करावा लागत आहे. माढ्यातील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने सात लाख ६० हजार ७७६ टन ऊस गाळप करत राज्यात दुसरे स्थान पटकाविले आहे.

पावसाअभावी जिल्ह्यात यंदा ऊस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात जिल्ह्यातील कारखान्यांना ऊसतोडणी यंत्रणेचा या वर्षी मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात चालू असलेल्या ३४ पैकी बोटावर मोजण्याइतक्याच कारखान्यांकडे समाधानकारक ऊसतोडणी यंत्रणा आहे.

जिल्ह्यातील कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ५६ हजार ६०० टन इतकी आहे. ही ऊसतोडणी यंत्रणेच्या कमतरतेमुळे दररोज ९२ हजार टन गाळप होत आहे. जिल्ह्यात यंदाच्या आतापर्यंतच्या ३१ डिसेंबरपर्यंतचा गाळपाचा आढावा घेतला असता साखर कारखान्यांनी ७४ लाख ४१ हजार ११८ टन उसाचे गाळप केले आहे.

जिल्ह्यातील कारखानानिहाय गाळप साखर कारखाना पूर्ण केलेले गाळप (टनांत)

सहकारमहर्षी, अकलूज साडेचार लाख

विठ्ठल, पंढरपूर साडेचार लाख

जयहिंद शुगर, दक्षिण सोलापूर चार लाख

बबनराव शिंदे आणि गोकूळ शुगर प्रत्येकी तीन लाख

लोकनेते, सासवड माळी, लोकमंगल (भंडारकवठे), सिद्धेश्‍वर, विठ्ठलराव शिंदे (करकंब), आवताडे शुगर, युटोपियन, गोकूळ -माउली प्रत्येकी दोन लाख

विठ्ठल कार्पोरेशन, सिध्दनाथ, श्री शंकर, सीताराम महाराज, भैरवनाथ (लवंगी) दोन लाखांजवळ

सांगोला, जकराया, भैरवनाथ (विहाळ), भीमा, विठ्ठल रिफाइंड प्रत्येकी एक लाख

सहकार शिरोमणी, संत कुर्मदास, लोकमंगल (बिबीदारफळ), इंद्रेश्‍वर, येडेश्‍वरी, आष्टी शुगर, भैरवनाथ (आलेगाव) एक लाखाच्या आत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vice President Election: जे.पी. नड्डा उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएचे अधिकृत उमेदवार; एनडीएच्या बैठकीत शिक्कामोर्तब

Hatnur Dam : ...आतापर्यंत केवळ हतनूर सिंचन प्रकल्पातूनच विसर्ग सुरू

Ladki Bahin Yojana : लाखावर ‘लाडक्या बहिणी’ लाभापासून राहणार वंचित

e-Peek Pahani : शेतकऱ्यांच्या ई-पीकपाहणीला जळगाव जिल्ह्यात गती

Banana Plantation : उशिराची मृग बहर केळी लागवड सुरू

SCROLL FOR NEXT